कंठवली येथील समवेद लॉजिस्टिक गोदामाला आग : कोठ्यावधिंचा माल जळून खाक
उरण (विठ्ठल ममताबादे):- उरण तालुक्यातील विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील कंठवली येथील समवेद लॉजिस्टिक इन्फ्रा रिसॉरसेस प्रा.लि. या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला दिनांक ८ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ठिक २-३० वाजताचे सुमारास आग लागल्याची दुर्घटना घडली आहे.या आगीची तीव्रता एवढ्या प्रमाणात होती की,तळमजला आणि त्यावरील शेड असलेल्या प्रत्येकी शेडमधील माल संपूर्ण गोदाम जळून खाक झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनला तात्काळ पाचरण करण्यात आले मात्र सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.मात्र सायंकाळ पर्यंत मोठ्या प्रमाणात खेळणीच्या वस्तू आणि केमिकल पदार्थ असल्याने आग आटोक्यात येत नव्हती.
उरण तालुक्यात मालाची हाताळणी करणाऱ्या अनाधिकृत गोदामाचा गोरख धंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.तसेच वारंवार गोदामाला आग लागल्याच्या घटना या घडत आहेत.त्यात विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील चिरनेर - गव्हाण फाटा या रस्त्यावरील कंठवली बस स्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या सामवेदा लाँजिस्टीक या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला दिनांक ८ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ठिक २-३० च्या सुमारास आग लागल्याची दुदैवी घटना घडली.सदर गोदामात टेसणरी,खेळणी सह इतर माल असल्याचे समजत आहे.
या आगीची तीव्रता एवढ्या प्रमाणात होती की धुराचे लोट उंच उंच आकाशाला भिडले होते.सदर आगीची माहिती मिळताच सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. सदर आगीत मोठ्या प्रमाणात माल जळून गेले असल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.शार्ट सर्किटणे आग लागल्याचा प्रार्थमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी या गोदामात आग नियंत्रणासाठी कोणत्याही शेडमध्ये अग्निशमक वापरण्यात येणाऱ्या सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास येत आहे.याशिवाय गोदाम व्यवस्थापनाचे व्यवस्थापक उमेंद्र कतरे हे आगीच्या ठिकाणी अग्निशमनच्या गाड्या उशिरा पोहोचल्याने आग अधिक भडकल्याचे बेजबाबदारपणे वक्तव्य करीत असून,आमच्या कंपनीने विमा काढला आहे.त्यामुळे आम्ही सध्या या या आगी बाबत काहीही बोलू इच्छित नाही.अशी बेताल उत्तरे देत आहेत.
Comments
Post a Comment