
रायगड जिल्हा तळा तालुका शेनाटे भैरी क्रिकेट संघात अडनाळे क्रिकेट संघाची बाजी. तळा : नजीर पठाण :- रविवार दिनांक २५/२/२४ रोजी सुभाषचंद्र बोस मैदान (भाईंदरभ पश्चिम) येथे श्री भैरीदेवी चषक २०२४ ही स्पर्धा श्री भैरीदेवी क्रिकेट संघ (शेनाटे) यांनी मोठ्या उत्साहात शिस्त बद्ध पद्धतीने संपन्न केली. यातूनच कोणत्याही राजकीय पक्षाचे व इतर व्यक्तीचे आर्थिक सहकार्य न घेता ग्रामस्थ आणि पदाधिकारी व स्वयम युवा यांनी स्वतः देणगी गोळा करून एवढ्या मोठ्या स्वरूपात शेनाटे गावाचं ग्रामदैवत श्री भैरी देवी चषक २०२४ स्पर्धा संपन्न करण्यात युवा यशस्वी झाले. या स्पर्धेत एकूण 24 संघ सहभागी झाले होते. यातून पुढील संघ विजेता आणि उपविजेता ठरले. श्री भैरीदेवी चषक २०२४ विजेता संघ- प्रथम विजेता:- श्री कालभैरव क्रिकेट संघ - अडनाले द्वितीय विजेता:- के.सी.सी बॉइज संघ(अ)-बेलघर तृतीय विजेता:- जाखमाता क्रिकेट संघ – कोणथरे रोजगारासाठी मुंबई ठिकाणी येऊन क्रिकेट संघात सामील होऊन मैदानात , शैक्षणिक, व आर्थिक स्वरुपात ग्रामविकास कार्यात सहभाग घेणे ही प्रथा गेल्या पाच दशकापासून चालू आहे॰ श...