कोलाड विभागातील ज्येष्ठ नागरिकांनी घेतला वनभोजनाचा आनंद, वार्षिक स्नेह संमेलनात विविध कार्यक्रम
कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण):- रोहा तालुक्यातील कोलाड विभागीय स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाचा वन भोजनाचा १४ कार्यक्रम रविवार दि. २८ जानेवारी रोजी एकनाथ सखाराम लहाने यांचे मुठवली येथील संस्कृती फार्म हाऊस पुगाव येथे आयोजित आला होता या वार्षिक स्नेह संमेलनाला तसेच वन भोजनाला भरभरून प्रतिसाद देत विविध कार्यक्रमांचा आनंद घेत वन भोजनाचा आस्वाद घेतला.कोलाड विभागीय जेष्ठ नागरीक संघटना यांच्या संकल्पनेतून व अध्यक्ष मारुती राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रसंगी यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला दीप प्रज्वलन श्री गणेश प्रतिमेचे पूजन ज्या सभासदांचे गेली वर्षभरात निधन झाले आहे त्यांना श्रध्दांजली अर्पण करून करण्यात आली तसेच आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थीत मान्यवरांचे मनोगत तसेच तद्नंतर एकमेकांच्या समस्या ऐकुण घेत सदरच्या कार्यक्रमांत हभप महादेव महाराज महाडीक आणि हभप नारायण महाराज दहिंबेकर यांच्या सुश्राव्य प्रवचनचा लाभ घेत सकाळी आल्पोपहार दुपारी वनभोजनचा आस्वाद घेत या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
या प्रसंगी तीनशेहून अधिक जेष्ठ नागरीक तसेच जेष्ठ महीलांची उपस्थीत दर्शविली होती तर अध्यक्ष मारुती राऊत,आशोक कदम,केशव महाबळे,प्रवीण गांधी,गोरखनाथ कुर्ले,सौ प्रणिता गांधी,सरपंच विश्वनाथ धामणसे, नारायण धनवी, जवके,यानी उत्तम मार्गदर्शन व मनोगत व्यक्त केले तर मंगला राऊत यांनी साठाव वरिष धोक्याचे या वयात कोणती काळजी घ्यावी हे उत्तम गाणं गात सर्वांची मने जिंकली तर शेवटी कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीत वंदे मातरम् ने करण्यात आली.
तर सदरचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मारुती राऊत, कार्याध्यक्ष प्रविण गांधी, उपाध्यक्ष महादेव महाबळे, सह चिटणीस पांडुरंग सानप, खजिनदार केशव महाबळे, गोरखनाथ कुर्ले,नंदकुमार पवार,धनाजी घोणे,लक्ष्मण कदम,बळीराम ठोंबरे, हरिचंद्र जाधव, अशोक कदम, तसेच सर्व जेष्ठ नागरिक तसेच उपस्थित महिलांनी अथक परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment