पोसनि अजित साबळे यांनी दिड वर्षाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था उत्तम प्रकारे राखण्याचे काम केले:-संदेश लोखंडे

कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण):- रोहा तालुक्यातील कोलाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित साबळे यांचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला.या प्रसंगी बोलतांना कोलाड विभागीय कुणबी समाज अध्यक्ष संदेश लोखंडे यांनी सांगितले कि कोलाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हे गेल्या दिड वर्षांपासून रुजू झाल्यापासून त्यांनी कायदा व सुव्यस्था अतिशय उत्तम प्रकारे राखण्याचे काम केले हे त्यांच्या निरोप समारंभाच्या वेळी प्रचंड जमलेल्या लोकांवरून दिसत असुन ही जनसेवेची पोचपावती आहे.

कोलाड पोलिस सहाय्यक निरीक्षक अजित साबळे यांची बदली महाड शहर येथे करण्यात आली. त्यामुळे त्यांचा निरोप समारंभ व नवीन रुजू झालेले कोलाड पोलिस सहाय्यक निरीक्षक मोहिते यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम रविवार दि.२८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या महिला अध्यक्षा प्रितम पाटील,रायगड जिल्हा पोलिस पाटील संघाचे अध्यक्ष संतोष दळवी, कोलाड पोलिस पाटील संघाचे अध्यक्ष, गणेश पाटील, कोलाड पोलिस पाटील संघाचे सचिव संदिप बाईत,सदस्य कल्पेश पिंपळकर,स्नेहा जाधव,मंजिरी कदम, असंख्य पोलिस पाटील,पोलिस स्टापचे नरेश पाटील, मंगेश पाटील, शिद, जाधव, तावडे मॅडम, शिर्के मॅडम,निकम मॅडम,कोंजे मॅडम,तसेच अजय लोटणकर,जंगम स्वामी,संजय लोटणकर,बोरकर यांच्यासहीत असंख्य नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog