कुंडलिका नदीच्या काठावर अनधिकृत बांधकामे व बेकायदा रिव्हर राफ्टींग; जितेंद्र दिवेकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा
रोहा (प्रतिनिधी) : कुंडलिका नदीच्या काठावर ब्ल्यू लाईन आणि रेडलाईनमध्ये (पूररेषेमध्ये) सुरू असलेली अनधिकृत बांधकामे, तसेच नदीपात्रात मेरिटाईम बोर्डाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदा रिव्हर राफ्टींग सुरू असून हे बेकायदा प्रकार तातडीने न थांबविल्यास १२ फेब्रुवारी २०२४ पासून कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग (कोलाड डिव्हीजन) यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा माजी उपनगराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र रामभाऊ दिवेकर, धनगर आळी-रोहा यांनी दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी रायगड, तसेच सर्व संबंधित कार्यालयांना लेखी पत्राद्वारे सूचित करण्यात आलेले आहे.
येथील ग्रामपंचायत रोठ खुर्द हद्दीतील गट नं. १६/२, १६/२, १६/३, १७/१ यामधे बेकायदेशीरपणे व संबंधीत खात्याकडून संगनमताने मिळविलेल्या बेकायदेशीर व चुकीच्या पध्दतीने पुररेषेच्या आत इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तसेच श्री. मनोज बाळकृष्ण बाणखेळे यांच्या जमीनीमधे मे. वधर्मान दर्शन या भागीदारी संस्थेचे भागीदार १) श्री. सुरेश घेवरचंद जैन, २) राकेश कांतीलाल जैन, ३) कैलास कांतीलाल जैन आणि ४) मनिषा सचिन जैन यांनी सुरवात केली असून भुवनेश्वर येथील गट नं. २२ हिस्सा नं. १-६ अ व गट नं. २२ हिस्सा नं. ४ यामध्ये हे बांधकाम सुरू आहे. याप्रकरणी जितेंद्र दिवेकर यांनी पाटबंधारे विभागाकडे तक्रार करून देखील हे बांधकाम थांबविण्यात आलेले नाही.
पुररेषेमधे बांधकाम करणे यांस परवानगी नसताना कर्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांच्या ना हरकत दाखल्यावरून ग्रामपंचायत रोठ खुर्द यानी संगनमताने व परिणामाचा कोणताही विचार न करता सदरची परवानगी दिलेली आहे. सदर बांधकामात खाली गाळे व वर सदनिका अशा स्वरूपाचे आहे. सदर इमारतीमधे रहिवासी कारणासाठी जनसामान्य त्यांचे कर्ज व कमविलेली पुंजी खर्च करून विकत घेणार असून, त्यांची फसवणूक व दिशाभूल होणार आहे. तसेच पुररेषेमधे असलेल्या पुराच्या धोक्यामुळे त्यांच्या जिवीतास धोका आहे. आणि बेकायदेशीर बांधकामावर कार्यवाही होऊन बांधकाम न पडल्यास जन सामान्यांचे फार मोठे कधीही न भरून येणारे असे नुकसान होणार आहे व जीवीतहानी आणि मालमत्तेची हानी होणार असून, त्यास कोण जबाबदार राहणार आहे. त्याबद्दल कोणताही खुलासा संबंधित अधिकारी यांनी आपपर्यंत केलेला नाही.
तसेच, मेरीटाईम बोर्डाकडून कोणतीही परवानगी न घेता कुंडलिका नदीपात्रात वॉटर स्कुटर, स्कॉट इंजीन बोट, विंडो सर्फींग बोट व स्पीड बोट अशा एकूण १०० ते १५० बोटी बेकायदेशीरपणे चालविण्यात येत आहेत. सदरनी रिव्हर राफ्टींगचा परवाना संबंधीत खात्याची दिशाभूल करून नंबर नसलेल्या बोटीचा वापर बेकायदेशीरपणे करण्यात येत आहे. कोणतीही परवानगी नसताना चालविलेल्या जात असलेल्या बोटींग करताना खेळाडूंच्या सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात येत आहे. हे बेकायदेशीर धोकादायक रिव्हर राफ्टींग व अॅडव्हेंचर स्पोर्टस तात्काळ थांबविण्यात न आल्यास कार्यकारी अभियंता, रायगड जिल्हा पाटबंधारे विभाग, कोलाड डिव्हीजन, ता. रोहा यांच्या कार्यालयासमोर दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११-०० वाजल्यापासून अमरण उपोषणास बसण्याचा इशारा जितेंद्र दिवेकर यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment