खांब येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा 

  कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण):- नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचालित श्री.रा.ग पोटफोडे (मास्तर)खांबच्या १९९८/९९ मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवार दि.११/२/२०२४ रोजी मुंबई-गोवा हायवे वरील कवितके फार्म येथे आयोजित करण्यात आला.

 पूर्वीच्या काळात आश्रमात असणाऱ्या गुरूंची  चरण धुऊन जशी पूजा केली जात होती.तशी आपण ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेतील गुरुजनांनी आपल्यावर केलेले संस्कार यामुळे आपण विविध क्षेत्रात नोकरी करू लागलो याची सामाजिक बांधिलकी राखत या शाळेचे माजी विद्यार्थी २५ वर्षांनी एकत्र येऊन सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शाळेचे मुख्यध्यापक म्हात्रे सर, खांडेकर सर,धनवी सर, भोसले सर,आंबेकर मॅडम,खांडेकर मॅडम, म्हसकर मॅडम, नागोठकर मॅडम, शाळेचे शिपाई शिंदे यांना फुलांचा वर्षाव करत स्टेज पर्यंत आणण्यात आले. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून सर्व शिक्षकांचा फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नंतर सर्वांचा कौटुंबिक परिचय करुन देण्यात आला.

 यावेळी माजी विद्यार्थी किशोर सावरकर, नरेंद्र पारठे,सचिन मोरे, महेश महाबळे,समीर बामुगडे,उमेश धामणसे,अजित निकम,लक्ष्मण वरखले,गोविंद कापसे, लिलाधर कापसे, मनोज चितळकर,गणेश मोरे,अंकुश टवले, निता पिंपळकर, सुगंधा घरट,योगिता सावरकर, रोशन सावरकर, शिल्पा म्हसकर,उपस्थित होते.यावेळी मुख्यध्यापक अविनाश म्हात्रे सर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले कि तुम्ही नोकरी व्यावसाया निमित्त कोठेही असा परंतु मोबाईलच्या माध्यमातून सर्वांच्या संपर्कात रहा व सर्वांच्या सुख दुःखात सहभागी व्हा याप्रमाणे आमच्या सर्व शिक्षकांचा जो सत्कार केलात तो सदैव आमच्या स्मरणात राहील.

Comments

Popular posts from this blog