पुगाव रायगड जिल्हा परिषद शाळेत शिव जयंती निमित्ताने विविध स्पर्धा यशस्वी. 

कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण):- प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगिराज श्रीमंत कुळवाडी भूषण शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा उत्सव शिवजन्माचा, स्वराज्य कार्याचा, स्वराज्य सप्ताह, राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री  अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे, महीला प्रदेशाध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे व आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून रोहा तालुक्यातील रा.जि.प. केंद्र शाळा पुगाव येथे महिला तालुका अध्यक्षा सौ.प्रितम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आला याला विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

रयतेचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म उत्सवा निमित्ताने तसेच उत्सव शिवजन्माचा, स्वराज्य कार्याचा, स्वराज्य सप्ताह, या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान तसेच चित्र कला स्पर्धा आयोजित करण्यात आले. तसेच यशस्वी रित्या पार पडलेल्या चित्रकलेत व वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेल्या तसेच सहभागी झालेल्या सर्व  विद्यार्थ्याना या प्रसंगी बक्षिस वाटप करण्यात आले.

मोठ्या उत्साही वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते नारायण धनवी, तालुका अध्यक्षा प्रितम पाटील,सुरेखा पार्टे,किशोरी सावरकर,मानसी पार्टे, नवनिर्वाचित शालेय शिक्षण कमिटच्या अध्यक्षा ऋतुजा देशमुख, ग्रामपंचायत पुगाव उपसरपंच निलम कळमकर,सदस्य राम धुपकर,आदिती झोलगे, सुधीर शेळके, सेवा निवृत्त शिक्षक विठ्ठल येलकर,गजानन देवकर, सुरेश देशमुख, रमेश देशमुख, साक्षी खामकर, शाळेचे मुख्याध्यापक निवास थळे सर, सहशिक्षक प्रसाद साळवी सर, शाळा कमिटी सर्व सदस्य व पालक तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog