रोठखुर्दच्या उपसरपंचपदी राकेश मारुती मोरे यांची बिनविरोध निवड
कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण):- रोहा तालुक्यातील प्रतिष्ठीत असलेल्या ग्रामपंचायत रोठखुर्दच्या सरपंच गीता जनार्दन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाच्या झालेल्या निवडणुकीत उपसरपंचपदी राकेश मारुती मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
यावेळी उपसरपंच ज्योती प्रकाश डाके, सदस्य जनार्दन नारायण मोरे, महेंद्र गोपीनाथ कांबळे, सुनीता मंगेश मोरे, सचिन मारुती मोरे, मेघा अमोल ढमाले, हर्षाली महेंद्र कांबळे, ग्रामसेविका अर्चना पाटील, माजी सरपंच लिलाधर पांडुरंग मोरे, हरिचंद्र सखाराम मोरे, लक्ष्मण मोरे, रमेश हरी मोरे, उमाजी परशुराम मोरे, विठ्ठल पांडुरंग बोरेकर, प्रकाश डाके, अमोल ढमाले, मंगेश मोरे, शंकर मारुती मोरे, राजेश मोरे, मुकुंद पांडुरंग मोरे, विश्वास मोरे, दत्ता शंकर मोरे, अस्मिता नितेश मोरे, ज्योत्स्ना रविंद्र मोरे, हेमंत नथु मोरे, निकेश कर्णेकर, आनंद कर्णेकर आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment