खांब गावचे विठोबा टवले यांचे दुःखद निधन
कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण) :- रोहा तालुक्यातील खांब गावातील रहिवाशी विठोबा गणपत टवले यांचे सोमवार दि.५ फेब्रुवारी २०२४ रोजी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७५ वर्षाचे होते.ते प्रेमळ व परोपकारी स्वभावाने सर्वांना परिचित होते. सामाजिक कार्यात ते नेहमी सक्रिय होते.
त्यांच्या मृत्यूची वार्ता कळताच त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांचे नातेवाईक,सामाजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील असंख्य नागरिक, समस्त खांब ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,एक मुलगा,दोन मुली,बहीण,पुतणे,जावई,नातवंडे व मोठा टवले परिवार आहे त्यांचे दशक्रिया विधी बुधवार दि १४ फेब्रुवारी तर उत्तर कार्य विधी शनिवार दि.१७ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांच्या निवास्थानी होणार आहेत.
Comments
Post a Comment