रायगड जिल्हा तळा तालुका शेनाटे भैरी क्रिकेट संघात अडनाळे क्रिकेट संघाची बाजी.
तळा : नजीर पठाण :- रविवार दिनांक २५/२/२४ रोजी सुभाषचंद्र बोस मैदान (भाईंदरभ पश्चिम) येथे श्री भैरीदेवी चषक २०२४ ही स्पर्धा श्री भैरीदेवी क्रिकेट संघ (शेनाटे) यांनी मोठ्या उत्साहात शिस्त बद्ध पद्धतीने संपन्न केली. यातूनच कोणत्याही राजकीय पक्षाचे व इतर व्यक्तीचे आर्थिक सहकार्य न घेता ग्रामस्थ आणि पदाधिकारी व स्वयम युवा यांनी स्वतः देणगी गोळा करून एवढ्या मोठ्या स्वरूपात शेनाटे गावाचं ग्रामदैवत श्री भैरी देवी चषक २०२४ स्पर्धा संपन्न करण्यात युवा यशस्वी झाले. या स्पर्धेत एकूण 24 संघ सहभागी झाले होते. यातून पुढील संघ विजेता आणि उपविजेता ठरले.
श्री भैरीदेवी चषक २०२४ विजेता संघ-
प्रथम विजेता:- श्री कालभैरव क्रिकेट संघ - अडनाले
द्वितीय विजेता:- के.सी.सी बॉइज संघ(अ)-बेलघर
तृतीय विजेता:- जाखमाता क्रिकेट संघ – कोणथरे
रोजगारासाठी मुंबई ठिकाणी येऊन क्रिकेट संघात सामील होऊन मैदानात , शैक्षणिक, व आर्थिक स्वरुपात ग्रामविकास कार्यात सहभाग घेणे ही प्रथा गेल्या पाच दशकापासून चालू आहे॰ शेनाटे गावातिल युवा एक वैचारिक व परिवर्तनवादी फळी तयार करत आहे.ही फळी नक्कीच गावाला प्रगती पथावर व सामाजिक पटलावर सुद्धा पुढे घेऊन जाण्यात यशस्वी होत आहे.
ग्रामीणठिकाणी मोफत आयुष्यमान कार्ड वाटप, शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शन शिबिर, उच्च शिक्षित विद्यार्थी यांचा गुणगौरव करणे, किवा सरकारी भरतीसाठी नव युवकाना मार्गदर्शन करणे असे आतापर्यन्त संघातर्फे व ग्रामीण आणि मुंबई दोन्ही मंडळाच्या मार्गदर्शनाखाली असे अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले आहे व ते यशश्वी करण्यात आले आहेत याचं प्रत्यक्ष दर्शन काल राबविण्यात आलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून दिसून आले॰ ही स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रिकेट संघ, ग्रामीण आणि मुंबई दोन्ही मंडळाच्या पदाधिकारी आणि संपूर्ण गावाने अतोनात मेहनत घेतल्याचे दिसून आले यामुळेगाव गुण्यागोविंदाने एकत्र नांदावे या करिता समाजातून अनेक मान्यवर व युवा या गावाला सहकार्य करण्यासाठी उपस्थित होते हे ही दिसून आले.
Comments
Post a Comment