कोलाड परिसरातील चौपदरीकरणाचे काम थंडावला  महिसदरा नदीवरील पुलाचे काम दोन महिन्यापासून बंद 

 कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण):- मुंबई-गोवा हायवे वरील चौपादरीकरणाचे काम मे २०२४अखेर पूर्ण होईल अशी माहिती प्राधिकरणाने दिली आहे परंतु कोलाड परिसरातील मुंबई-गोवा हायवे काम थंडावला असुन या परिसरातील पुई हद्दीत असणाऱ्या महिसदरा नदीवरील पुलाचे काम दोन महिन्यापासून बंद आहे यामुळे मे अखेरीस या मार्गाच्या चौपदरी करणाचे काम पूर्ण होईल काय?असा सवाल प्रवाशी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 रायगड जिल्ह्यातील पळस्पे ते इंदापूर दरम्यानचा ८४ किलोमीटरचा रस्ता हा गेली १५ वर्षांपासून सुरु असुन या कामात फक्त तारीख पे तारीख दिली जात असुन या मार्गाचे काम मे अखेर पूर्ण होईल असे सांगण्यात येत आहेत परंतु कोलाड, खांब, नागोठणे येथून उड्डाण पुलाचे वरून जाणाऱ्या रस्त्याचे काम ही अद्याप सुरु नाही.या चौपदरीकरणाच्या कामासाठी किती ठेकेदार गेले व किती आले हे ही सांगता येत नाही.परंतु या महामार्गाचे काम पुर्ण झाले नाही.काही ठिकाणी ज्या रस्त्याचे काम झाले आहे त्या ठिकाणच्या साईड पट्टया दोन ते तीन फूट खोल आहेत यामुळे एखादा वाहन थोडा जरी साईडला गेला तर मोठा अपघात होऊ शकतो.तसेच नागोठणे,वाकण,सुकेळी रस्त्यावरून जातांना प्रवाश्यांना धुळीचा सामना करावा लागत असुन ही धुळ ऐवढी  भयानक आहे कि समोरून येणारी वाहने दिसत नाही यामुळे मोठा अपघात होऊन कोणाचा तरी नाहक बळी जाऊ शकतो मग याला जबाबदार कोण?असा सवाल प्रवाशी वर्गातून केला जात आहे.

 प्रतिक्रिया 

 कोलाड परिसरात चौपदरीकरणाचे  कोणतेही काम सुरु नाही शिवाय या परिसरातील पुई गावाच्या हद्दीतील महिसदरा पुलाचे काम तर दोन महिन्यापासुन बंद आहे,खांब मध्ये तर कोणतेही काम सुरु नाही मग महामार्ग प्राधिकरणाने मे महिन्या अखेर पहिल्या टप्प्याचे काम पुर्ण होईल असे सांगितले परंतु अशा परिस्थितीत दिलेल्या मुद्दतीत तरी हे काम पुर्ण केले जाईल काय? अशा सवाल पुई येथील सामाजिक कार्यकर्ते दिनकर सानप यांनी महामार्ग प्राधिकरणाला केला आहे.

Comments

Popular posts from this blog