शिवसेना नवीन शेवा शाखेचा ३६ वा वर्धापनदिन व हळदीकुंकू कार्यक्रम दिमाखात व जल्लोषात संपन्न.
उरण (विठ्ठल ममताबादे):- ३१ जानेवारी १९८८ रोजी मराठी चित्रपट सृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, शाहीर स्वर्गीय दादा कोंडके यांच्या हस्ते स्थापन झालेल्या शिवसेना नवीन शेवा शाखेचा ३६ वा वर्धापनदिन व हळदीकुंकू कार्यक्रम बुधवार दिनाकं ३१ जानेवारी २०२४ रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन शेवा येथे संपन्न झाला. या वेळी महिला आघाडी तर्फे मालती मनोहर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली हळदीकुंकू कार्यक्रमाचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते व लकी ड्रॉ प्रमाणे दहा महिलांना पैठणी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमासाठी संपूर्ण नवीन शेवा गाव भगवामय झाला होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, मावळ लोकसभा संघटक संजोग वाघोरे , माजी जिल्हाप्रमुखव दिनेश पाटील,उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी सांगितले की येणाऱ्या निवडणुकीत उरणचे शिवसैनिक हे २०१९ प्रमाणे गद्दारी सहन करणार नाहीत आणि पुन्हा एकदा मावळ लोकसभा आणि उरण विधानसभेवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकेल असे सांगितले. माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि २०२४ चे उरणचे आमदार हे मनोहरशेठ भोईर हेच असणार असे सांगत त्यांच्या कार्याचा गौरव केला.उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांनी भाजपची जी देशात आणि राज्यात हुकूमशाही चाललीय त्याचा खडसून समाचार घेतला.नवनिर्वाचीत मावळ लोकसभा संघटक संजोग वाघोरे पाटील यांनी देखील मनोहरशेठ भोईर यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले, त्यानंतर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती लाभलेल्या शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना ठाकरे शैलीत ठणकावून सांगितले कि आम्ही हिंदुत्व नाही तर आम्ही भाजप सोडले कारण हि भाजपा आता पूर्वीची भाजपा राहिली नाही. त्याच बरोबर महिलांच्या रोजच्या समस्या देखील मांडताना त्यांनी भाजपावर हल्ला चढविला. मनोहरशेठ भोईर यांना मी माजी आमदार मानत नाहीत असे मत व्यक्त करत माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी केलेल्या सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कामाचा कौतुक व कोरोना काळात दिलेले योगदान याबद्दल त्यांचे भरभरून कौतुक केले व पुढच्या वर्धापन दिनाला व्यासपीठावर मावळचा खासदार व उरण चा आमदार हा शिवसेनेचा असेल असा विश्वास ज्योती ठाकरे यांनी व्यक्त केला.
जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर म्हणाले की, आज शिवसेना नवीन शेवा शाखेचा ३६ वा वर्धापनदिन साजरा होत आहे म्हणजे आमच्याही राजकीय व सामाजिक जीवनाला ३६ वर्ष पूर्ण होत आहेत, या उरण तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक यांनी एकत्र येऊन टीम वर्क ने काम करून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविण्याचा निर्धार करूया असे आवाहन करून मावळ लोकसभा व उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद उभी करून पुढचा खासदार व आमदार शिवसेनेचाच निवडून आणण्यासाठी संकल्प करूया असे नमूद केले, यावेळी नवीन शेवा येथील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तसेच चिरनेर चे नवनिर्वाचित सरपंच भास्कर मोकल व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, उरण तालुका संघटक बी एन डाकी, जिल्हा युवा अधिकारी पराग मोहिते, उरण शहरप्रमुख विनोद म्हात्रे, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, तालुका संपर्कप्रमुख दीपक भोईर, उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, उपतालुका संघटक के एम घरत, अमित भगत, द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर, शहर संघटक किसन म्हात्रे, शिक्षक नेते नरेश मोकाशी, कामगार नेते गणेश घरत, विभागप्रमुख मधुकर ठाकूर, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका ममता पाटील, तालुका संपर्क संघटिका प्रणिता म्हात्रे, विधानसभा संघटिका ज्योती म्हात्रे, उप तालुका संघटिका मनीषा ठाकूर, उरण शहर संघटिका मेघा मेस्त्री, हुसेना शेख, मुमताज भाटकर, सायरा खान, हसीमा सरदार, कविता गाडे, माजी पंचायत समिती सदस्या सरिता पाटील, नगरसेवक अतुल ठाकूर, शिक्षक नेते नरेश मोकाशी, विभागप्रमुख संदेश पाटील, सरपंच सोनल घरत, सी के गायकवाड, बळीराम ठाकूर, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक रोहिदास पाटील, उरण तालुक्यातील पदाधिकारी, शाखाप्रमुख, कार्यकर्ते व मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखाप्रमुख शैलेश भोईर, उपशाखाप्रमुख भुपेंद्र भोईर, अशोक म्हात्रे, सिद्धेश म्हात्रे, सुरेश पाटील, कार्याध्यक्ष दिलीप घरत, ग्रामपंचायत सदस्य कुंदन भोईर, सतीश सुतार, भूपेंद्र पाटील, अशोक दरणे, वैशाली म्हात्रे, प्रणिता भोईर, महिला शाखासंघटिका वैशाली सुतार, मयुरी घरत, शुभांगी भोईर,सुरेखा भोईर, सुनंदा भोईर, प्रमिला घरत, वासंती म्हात्रे, देवयानी भोईर, रंजना म्हात्रे, वंदना पाटील, मनीषा घरत, वनिता म्हात्रे, नयना ठाकूर, दिनेश घरत, एल जी म्हात्रे, शेखर पडते, पंकज सुतार, निलेश घरत, अजय सुतार, परशुराम ठाकूर, धनाजी भोईर, केशव घरत, मिलिंद भोईर, मोरेश्वर घरत, महिला आघाडीच्या पदाधिकारी श्रीमती वासंती म्हात्रे, रंजना म्हात्रे, प्रमिला घरत, जागृती घरत, सुनंदा भोईर, शुभांगी भोई, वैशाली म्हात्रे, वैशाली घरत, मनीषा घरत,महिला आघाडी कार्यकर्त्या कार्यकर्ते व शिवसैनिक यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश पंडित यांनी केले.
Comments
Post a Comment