जेष्ठ पत्रकार कांतीलाल गांधी यांचे ८६ वर्षात पदार्पण
गोवे - कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण):- कोलाड येथील जेष्ठ पत्रकार कांतीलाल गांधी यांचा रविवार दि.२५ रोजी ८५ वा वाढदिवस असुन ते ८६ वर्षात पदार्पण करीत आहेत.ते पुणे येथील महाविद्यालयात असतांना त्यांनी पुणे शहरातील प्रसिद्ध उद्योपती किर्लोस्कर बंधू यांच्या स्वारगेट येथील प्रेस मध्ये पार्ट टाइम नोकरी केली. प्रेस मध्ये त्री मासिक व मनोहर इत्यादी मासिकांचे प्रूफिग केले याचा त्यांना अनुभव मिळाला.
या नंतर वरसगांव (कोलाड )येथे गावी आल्या नंतर त्यांनी मुंबई येथून प्रसिद्ध होणारे दै. नवाकाळ, चिपळूण मधील कै. नानासाहेब जोशी यांचे दै. सागर, दै. लोकसत्ता या वर्तमान पत्रातून कोलाडचे प्रतिनिधी म्हणून काम केले. तसेच त्यांनी विविध स्थानिक व शासकीय कमिटीवर काम केले.
यामध्ये वरसगांव कामगार केंद्राचे सल्लगार, आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सल्लगार, आमदार कै. सावंत मास्तर यांचे सल्लगार, सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष, रोहा तालुका पत्रकार अध्यक्ष,अशा अनेक पदावर काम केले तसेच कोलाड हायस्कूल इमारत पुर्ण होईल पर्यंत प्रयत्न केले,पत्रकार इमारती साठी शासनाकडून मान्यता आणुन या बिल्डिंग साठी आ.सुनील तटकरे यांच्या कडून ५ लाख रु. चा निधी उपलब्ध करून घेतला. स्थानिक ३० ते ३५ तरुणांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे धाटाव एम.आय.डी.सि. रोजगार मिळून दिला,मागासवर्गीय यांना संजयगांधी योजनेचा लाभ मिळवून दिला.अशा सेवाभावी जेष्ठ पत्रकार आमच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
Comments
Post a Comment