सुनंदा खांडेकर यांचे दुःखद निधन
कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण) :- रोहा तालुक्यातील पाले येथील रहिवाशी सुनंदा बाळु खांडेकर यांचे शुक्रवार दि.१६/२/२०२४ रोजी दुःखद निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ७६ वर्षाचे होते.त्या अतिशय प्रेमळ व परोपकारी स्वभावाने सर्वांना परिचित होत्या. तसेच सामाजिक कार्यात त्या नेहमी सक्रिय होत्या.
त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे नातेवाईक,सामाजिक,राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील असंख्य नागरिकांसह समस्त वरवठे पाले ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे,एक मुलगी,नातवंडे व मोठा खांडेकर परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी रविवार दि.२५ फेब्रुवारी तर उत्तर कार्यविधी मंगळवार दि २७ फेब्रुवारी २०२४ त्याच्या राहत्या निवास्थानी होणार आहेत.
Comments
Post a Comment