कोलाड परिसरातील नदी पात्रात कोंबड्यांची पिसे व विविध प्रकारचा कचरा, नदीचे पात्र दूषित,जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण):- मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील कोलाड परिसरातील गोदी व महिसदरा नदीच्या दोन्ही पुलावरून कोंबडयांची पिसे,आतड्या,व इतर कचरा बेशिस्तपणे टाकला जात असुन या नदीचे पाणी या परिसरातील नागरिक पिण्यासाठी व शेतीसाठी वापरत असल्यामुळे या परिसरात असणाऱ्या गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून या प्रकारामुळे या परिसरातील नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हा कचरा रात्री ९.०० वाजण्याच्या सुमारास टूव्हीलर, फोरव्हीलर गाडीतून आणुन बाजूला कोण येत नाही हे बघून दोन्ही पुलावरून बेशिस्तपणे टाकला जात जातो याचाच फायदा घेऊन या ठिकाणी राहणारे रहिवाशी हि इतर कचरा टाकत आहेत.यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.या मार्गांवर शाळा कॉलेज, बाजारपेठेत, असल्यामुळे येथून शालेय विद्यार्थ्यांपासून वयोवृद्ध पर्यंत असंख्य नागरिक येजा करीत असतात या बाजूनी प्रवास करतांना सर्वाना आपला नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तर याच पुलाच्या बाजूला ट्रॉपिक पोलिस उभे राहत असुन त्यांना हि दिवसभर मास्क बांधून उभे रहावे लागत आहे.
गोदी व महिसदरा दोन्ही नदीचे पाणी जवळच असलेल्या कुंडलिका नदीला जात असल्यामुळे या नदीचे पाणी पाले.बु, संभे,पाले खुर्द,पुई,गोवे,मुठवली,बाहे,यांच्या सहित असंख्य नागरिक पिण्यासाठी वापरत असल्यामुळे या परिसरतील नागरिकांना विविध आजाराला सामोरे जावे लागत असुन यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित ग्रामपंचायत, प्रशासन, प्रदूषण मंडळ यांनी नदी पात्रात कचरा कोण टाकतो?याचा शोध घेऊन या संबंधित व्यक्तींवर कार्यवाही केली जावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
Comments
Post a Comment