Posts
Showing posts from March, 2024
- Get link
- X
- Other Apps
आंबेवाडी जि. प. मध्ये भाजपा तालुका अध्यक्ष युवा मोर्चा श्री.महेशदादा ठाकुर यांनी शिवजयंती निमित्ताने विविध गावात भेटी दिल्या. रोहा : प्रमोद गायकवाड :- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने भाजपा रोहा तालुका अध्यक्ष युवा मोर्चा श्री. महेश दादा ठाकुर यांनी आंबेवाडी जिल्हा परिषद मतदार संघातील नडवली, घेरासुरगड वैजनाथ, कोलाड, पालेखुर्द, तसेंच श्री चंद्रकांत लोखंडे आयोजित छत्रपती शिवजयंती उत्सव आंबेवाडी या ठिकाणी भेटी दिल्या, घेरासुरगड व नडवली गावातील यंदा शिवजयंती उत्सव विशेष होता कारण छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नवीन तयार केले आहे त्यामुळे त्या गावातील ग्रामस्थ व महिला व युवा वर्ग यांचा उत्साह मोठा होता यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष युवा मोर्चा महेशदादा ठाकुर यांनी सर्वांशी संवाद साधला. यावेळी जेष्ठ नेते संजय लोटनकर,जेष्ठ नेते माजी सरपंच रघुनाथ कोस्तेकर, जेष्ठ नेते शांताराम माने, वरसगांव बुथ प्रमुख रवींद्र शिंदे, रोहा तालुका मीडिया संयोजक कल्पेश माने, नडवली गावाचे युवा कार्यकर्ते ऋतिक ढोकरे उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
लोणेरे पेट्रोलपंपाजवळ आणि गोरेगावमध्ये बेकायदा "चोराटी मटका" सुरू; बंद असल्याचा दिखावा मटका खेळणाऱ्यांच्या गर्दीमुळे होतोय आचारसंहितेचा भंग स.पो.नि. विजय सुर्वे यांना लाखो रूपयांचा हप्ता? गोरेगाव बाजारपेठ मध्ये विनायक भाऊचा लोणेरे मध्ये रवी पप्या यांचा मटका जुगार जोरात रायगड : प्रतिनिधी :- मुंबई गोवा महामार्गावरील लोणेरे येथे पेट्रोल पंपाजवळ एका सलूनच्या बाजूला बेकायदा चोराटी मटका जुगार सुरू असून गोरेगावमध्ये गोरेगाव-म्हसळा रोडलगत सन्मान बार च्या बाजूला चिकन शॉपच्या बाजूला अवैध मटका जुगाराचा धंदा सुरू असून गोरेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी यांनी या अवैध धंद्यांना पाठबळ दिल्याचे स्पष्ट होत चालले आहे. या दोन्ही ठिकाणांवर मटका बंद असल्याचा दिखावा जरी करण्यात येत असला तरी चोराटी पद्धतीने येथे मटका जुगार सुरू असून येथे पोलीसांचे लागेबांधे असल्यामुळे या अवैध धंद्यावर कारवाई होत नसल्याचे दिसत आहे. लोणेरे येथे पप्या आणि रवी नावाची माणसे हा अवैध धंदा चालवित असल्याचे दिसून आलेले आहे. तसेच गोरेगाव येथे येथे विनायक नावाच्या माणसाचा हा अवैध धंदा असून दोन्ही ठिकाणी मटका...
- Get link
- X
- Other Apps
माणगाव - निजामपूर मार्गावर "अविनाश" चा जुगार क्लब; माणगाव पोलीसांना लाखो रूपयांचा हप्ता? रायगड: प्रतिनिधी :- माणगाव - निजामपूर मार्गावर चव्हाणवाडी च्या हद्दीत एका हॉटेलच्या वर रूममध्ये बेकायदा जुगार क्लब राजरोसपणे सुरू असून या जुगार क्लबमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. परंतु पोलीसांनी मात्र हप्ता घेऊन या बेकायदा जुगार क्लबला पाठबळ दिल्याचे स्पष्ट होत चालले आहे. हप्ता घेऊन अवैध जुगार क्लब ला पाठींबा देणाऱ्या पोलीसांवर कारवाई कधी होणार? असा सवाल या परिसरातील सूज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांनी हा अवैध जुगार क्लब तातडीने बंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे. माणगाव - निजामपूर मार्गावरील चव्हाणवाडी च्या हद्दीत अविनाश नावाच्या माणसाचा हा जुगार क्लब चालू असल्याचे निदर्शनास आलेले आहे. या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. अनेक तरूण व वयोवृद्ध माणसे त...
- Get link
- X
- Other Apps
पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्चअखेर सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार पुणे : प्रतिनिधी : - नवीन वाहन नोंदणी आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या करवसुलीची रक्कम शासकीय तिजोरीत जमा होण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय येत्या शुक्रवार २९ मार्च ते रविवार ३१ मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहे. सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील महसूली उद्दीष्ट साध्य करण्यासाठी तसेच मार्चअखेर असल्यामुळे नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने गुड फ्रायडे २९ मार्च, शनिवार ३० मार्च व रविवार ३१ मार्च या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नवीन वाहन नोंदणी व त्याअनुषंगीक करवसुलीचे कामकाज तसेच इतर परिवहन विषयक कामकाज जसे थकीत कर वसुली व खटला विभागाचे (महसूल जमा होणारे कामकाज) कामकाज कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी कळविले आहे.
- Get link
- X
- Other Apps
टपाली मतपत्रिकेसाठी विहित नमुना वेळेत भरणे आवश्यक अकोला : प्रतिनिधी- : लोकसभा निवडणूकीत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करू इच्छिणा-या कार्यरत कर्मचा-यांनी विहित नमुना अधिसूचना निघाल्यानंतर पाच दिवसांत भरून देणे आवश्यक आहे, अशी सूचना निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय पाटील आदींनी यावेळी टपाली मतपत्रिकेच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही, निवडणूक आयोगाच्या विविध सूचना व निर्देश याबाबत आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयांना टपाल मतपत्रिकेचे नमुना 12 डी पुरविण्यात आले आहेत. ज्या अधिकारी व कर्मचा-यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करायचे आहे, त्यांनी हा नमुना भरून त्यांच्या कार्यालयप्रमुखांकडे द्यावा, अशी सूचना श्री. सिद्धभट्टी यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर (www.akola.gov.in ) नमुना 12 डी उपलब्ध करून दिला आहे. निवडणुकीची अधिसूचना निघाल्यावर पाच दिवसांच्या आत नमुना भरून देणे आवश्यक आहे, असे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. विविध अधिकारी व कर्मचारी उपस...
- Get link
- X
- Other Apps
जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी केली मतदान केंद्राची पाहणी रायगड : प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची पूर्व तयारी जोमाने सुरु आहे. विविध पातळ्यावर प्रशासकीय यंत्रणेमार्फत कामे सुरु आहेत. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे सुस्थितीत आणि सर्व सुविधा युक्त असावेत यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही सुरु आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज रायगड लोकसभा मतदार संघातील 192-अलिबाग या विधानसभा मतदार संघातील विविध मतदान केंद्रांना भेटी देवून पाहणी केली. तसेच सुविधांचा आढावा घेतला. आवश्यकतेनुसार तात्काळ दुरुस्ती डागडुजी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार विक्रम पाटील, नगर पालिकेच्या मुख्याधिकारी अंगाई सांळुखे आदी उपस्थित होते. श्री.जावळे म्हणाले भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहे, सावली, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्प आदि सुविधा पुरविण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक मतदान केंद्राचे सूक्ष्म नियोजन करुन अंमलबजावण...
- Get link
- X
- Other Apps
लोणेरे पेट्रोलपंपाजवळ आणि गोरेगावमध्ये बेकायदा मटका जुगार राजरोसपणे सुरू लोणेरे मध्ये बाबूठाणा, पप्या, रवी, गोरेगाव मध्ये विनायक भाऊचा मटका जुगार जोरात स.पो.नि. विजय सुर्वे यांना लाखो रूपयांचा हप्ता? रायगड : प्रतिनिधी :- मुंबई गोवा महामार्गावरील लोणेरे येथे पेट्रोल पंपाजवळ एका सलूनच्या बाजूला "बाबू ठाणा" नावाच्या माणसाचा मटका जुगार राजरोसपणे सुरू असून गोरेगावमध्ये गोरेगाव-म्हसळा रोडलगत सन्मान बार च्या बाजूला चिकन शॉपच्या बाजूला अवैध मटका जुगाराचा धंदा सुरू असून गोरेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी यांनी या अवैध धंद्यांना पाठबळ दिल्याचे स्पष्ट होत चालले आहे. लोणेरे येथे पप्या आणि रवी नावाची माणसे हा अवैध धंदा चालवित असल्याचे दिसून आलेले आहे. तसेच गोरेगाव येथे येथे विनायक नावाच्या माणसाचा हा अवैध धंदा असून दोन्ही ठिकाणी मटका खेळण्यासाठी गर्दी होण्याचा प्रकार दिसून आलेला असून या गर्दीमुळे येथे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला असून पोलीसच अवैध धंद्यांना साथ देत असल्यामुळे या परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊन आचारसंहितेचा भंग हो...
- Get link
- X
- Other Apps
निकृष्ट दर्जाच्या साईड पट्टयामुळे खाजगी ट्रॅव्हल बसचा अपघात, सर्व प्रवाशी सुखरूप, मोठा अनर्थ टलळा कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण):- मुंबई-गोवा हायवे वरील निकृष्ट दर्जाच्या साईड पट्टयांच्या कामामुळे खाजगी ट्रॅव्हल बसला वाकण नजीक अपघात झाला असुन सुदैवाने या बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप असुन मोठा अनर्थ टळला आहे. सविस्तर वृत्त असे कि मुंबई- गोवा हायवे वरून कोलाड कडून मुंबई कडे जाणाऱ्या खाजगी ट्रव्हल बस क्रमांक एम.एच.०३ डी. व्ही ७८९१ ही बस वाकण जवळ बाजू काढण्याच्या नादात साईड पट्टीवर आली असता निकृष्ट दर्जाच्या साईड पट्टयामुळे या बसची चार ही चाके या साईड पट्टयात घुसली परंतु ही बस रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या १५ते २० फूट खोल दरीत पलटी झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता परंतु दैव बलवान म्हणून सर्व प्रवासी सुखरूप बचावले. मुंबई-गोवा हायवे वरील चौपादरीकरणाचे काम गेली पंधरा वर्षा पासुन सुरु आहे. लोकनेत्याकडून फक्त तारीख पे तारीख दिली जात आहे परंतु या महामार्गाचे काम काही पूर्ण होईना ज्या साईडचे काम पूर्ण झाले आहे. त्या रस्त्याच्या साईड पट्टया माती टाकून फक्त भरल्या गेल...
- Get link
- X
- Other Apps
कोलाड जवळ रेल्वेच्या धडकेने तरुणाचा मृत्यू कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण):- रोहा तालुक्यातील कोलाड रेल्वे हद्दीतील रेल्वे रुळावर किमी नंबर १०/१२ जवळ एका तरुणाला रेल्वेची धडक लागून या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार सोमवार दि.२५/३/२०२४ रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास कोलाड रेल्वे रुळावर किमी नंबर १०/१२ जवळ पाले खुर्द येथील विशाल बाळकृष्ण जाधव वय वर्षे ३० याचा या रेल्वे रुळावरून जाणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेस लोकमान्य टिळक तर्मिनल ते थिरूअनंतपुरम गाडी नं.१६३४५ या गाडीने धडक दिल्याने या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असुन कोलाड पोलीस ठाण्यात याची आकस्मित मृत्यू अशी नोंद झाली असुन याचा अधिक तपास मपोना /१७७ एन.ए. शिर्के करीत आहेत.
- Get link
- X
- Other Apps
कोलाड लायन्स क्लबच्या सामाजिक बांधिलकीतून मुठवली खुर्द येथे उभारलेल्या सार्व. शौचालयाचे उद्घाटन. कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण):- रोहा तालुक्यातील मौजे मुठवली येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आराध्य दैवत भक्तांच्या हाकेला धावणारी नवसाला पावणारी मनातील भक्तांना कौल देणारी देवी आई रत्नाई (भवानी माता) मंदिर सभागृह परीसरात येथे श्रध्देने येणाऱ्या भक्तांसाठी सुसज्ज असे शौचालय लायन्स क्लब ऑफ कोलाड- रोहा यांच्या सामाजिक बांधिलकीतून उभारण्यात आला असुन त्याचे उद्घाटन सोहळा शुक्रवारी 22 मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल 3231 ए 4 लायन्स क्लब ऑफ कोलाड - रोहा यांच्या वतीने तसेच जिल्हा उप प्रांतपाल एम जे एफ लायन संजीव सुर्यवंशी,लायन प्रवीण सरनाईक,लायन डॉ नमिता मिश्रा मैडम,लायन महेश सावंत,लायन विजय कुमार गणात्रा,लायन रविंद्र घरत सर,लायन डॉ यशवंत चित्रे, लायन आर.पी.पांडे,लायन अरविंद घरत,लायन प्रियदर्शनी पाटील,कला प्रिंटर ,ऐरोली क्लब, अलिबाग क्लब,कोलाड लायन्स मेंबर्स यांच्या विशेष सौजन्याने तसेच ग्रामस्थ मुठवली खुर्द,ग्राम पंचायत मालसई यांच्य...
- Get link
- X
- Other Apps
पत्रकार प्रसाद गोरेगांवकर यांच्या प्रयत्नाना यश; गोरेगांवातील ती जागा सार्वजनिक बांधकाम विभागाचीच गोरेगांव : प्रतिनिधी :- गोरेगांव गांव तलावालगत असलेली सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (सर्व्हे नं १९७) या जागेची काल दि. १८ मार्च २०२४ रोजी मोजणी करण्यात आली असून ही जागा सार्वजनिक बांधकाम खात्याचीच असल्याचे निष्पन्न झाले आहे. गोरेगांव गांव तलावाशेजारी अनाधिकृतपणे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेत बांधकाम करण्यात आले असून या जागेत अतिक्रमण करण्यात आले आहे. या जागेची मोजणी करुन हद्द कायम करण्याकरीता पत्रकार प्रसाद गोरेगांवकर यांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करुन शासकीय जागा वाचविण्यासाठी दि. २६ जानेवारी २०२४ रोजी उपोषण देखील केले होते. या वेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता श्री. गणगणे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे काल दि. १८ मार्च रोजी मोजणी करण्यात आली. या मोजणी दरम्यान सदर जागा सार्वजनिक बांधकाम खात्याचीच असल्याचे सिद्ध झाले असून शासकीय जागा वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नात यशस्वी झाल्याने पत्रकार प्रसाद गो...
- Get link
- X
- Other Apps
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध आगारात मतदान जनजागृती पुणे : प्रतिनिधी : - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातील विविध आगारात अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान जागृती मंचाच्यावतीने मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये मतदार जागृती मंचाची स्थापना केली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातील दौंड, शिरूर मंचर व भोर आगार तसेच बारामती कार्यशाळा येथे मतदान जागृती मंचाच्यावतीने मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानाची शपथ घेतली. नैतिक मतदानाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये जागृती करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांना व मित्र परिवाराला मतदानाबाबत जागृत करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात कार्यक्रमांचे...
- Get link
- X
- Other Apps
कलश इन्टरटमेंट तर्फे अस्तित्व नारी सन्मान पुरस्कार २०२४ चे धुमधडाक्यात वितरण. उरण:(विठ्ठल ममताबादे):- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्लोक पाटील व कल्पना सुर्वे यांच्या संकल्पनेतून त्यांनी साकारलेल्या कलश इन्टरमेंट तर्फे अस्तित्व नारी सन्मान पुरस्कारांचे वितरण मोठ्या धुमधडाक्यात आणि जल्लोषात साजरे झाले. उरणमधील सिल्वर ओक ट्रॉपिकल रिसॉर्ट या ठिकाणी हा पुरस्कार वितरणाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मराठी अभिनेत्री व कलाकार भार्गवी चिरमुले, शैलजा घरत, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षा भावना घाणेकर व माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या सह इतर मान्यवर महिला उपस्थित होत्या. आलेल्या मान्यवरांवर पुष्पवृष्टी ने स्वागत करून या सुंदर कार्यक्रमाची सुरुवात झाली. खर तर अस म्हणतात एक महिला दुसऱ्या महिलेचा द्वेष, तिरस्कार करते पण अस नाही तर इथे श्लोक पाटील व कल्पना सुर्वे या दोन महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या महिलेस तीच्या कामाची पोचपावती, तीला प्रोत्साहन व इतर महिलांना त्...
- Get link
- X
- Other Apps
आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शेताच्या बांधावर मतदान जागृती पुणे : प्रतिनिधी : - आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत असून त्याअंतर्गत तहसीलदार संजय नागटिळक यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव विधानसभा मतदार संघातील स्वीप पथक मतदान जनजागृतीसाठी धामणी गावात शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले. शेतकऱ्यांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यासोबत त्यांनी मतदान प्रक्रीयेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास समन्वय अधिकारी सविता माळी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणीच्या मुख्याध्यापिका अनुराधा कथले, शिक्षक वृंद, स्वीप पथकातील सदस्य आदी उपस्थित होते. आंबेगाव तालुक्यात वाडी-वस्त्यांवर जावून मतदार जागृती करण्यात येत आहे. मतदारांना मतदार यादीत नाव शोधणे, मतदान केंद्रवारील सुविधा याबाबत माहिती देण्यात येत आहे. मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यासाठी अभिनव कल्पनांचा वापर कर्मचारी करीत आहेत. बस थांबा, आठवडे बाजार, गर्दीची ठिकाणे याठिकाणीदेखील फलक घेवून मतदारांना आवाहन करण्यात येत आहे. स्वीप पथकाद्वारे धामणी गावातून मतदान जनजागृती रॅ...
- Get link
- X
- Other Apps
आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य ‘शिवगर्जना’ आयोजन परभणी येथे 21 ते 23 मार्च रोजी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित ‘शिवगर्जना’ महानाट्याचे भव्य आयोजन शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिवचरित्राच्या भव्य सजीव देखाव्याची पर्वणी परभणी : प्रतिनिधी :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्षानिमित्त राज्य शासनाकडून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांवरील महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन केले जात आहे. परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रिडा संकुल, येथे दि. 21,22 आणि 23 मार्च, 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजता आशिया खंडातील सर्वात मोठे ‘शिवगर्जना’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे महानाट्य सर्व नागरिकांना विनामुल्य पाहता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांना करून देण्यासाठी 3 प्रयोगांचे आयोजन एकाच ठिकाणी सलग तीन दिवस करण्यात आले आहेत. हे महानाट्य पाहण्यासाठी सर्वांसाठी मोफत प्रवेश असणार आहे. सुमारे दहा हजार शिवप्रेमींसाठी या महानाट्याचे 3 दि...
- Get link
- X
- Other Apps
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सफाई सेवकांकडून मतदानाची शपथ पुणे : प्रतिनिधी :- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत असून त्याअंतर्गत भोसरी विधानसभा मतदार संघात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सफाई सेवकांना मतदानाची शपथ देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयामार्फत विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमात इंद्रायणीनगर, चिखली, जाधववाडी, अंकुशराव लांडगे सभागृह या परिसरातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सुमारे ५०० सफाई सेवकांनी मतदानाची शपथ घेतली. यावेळी क क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, भोसरी विधानसभा मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी तानाजी दाते उपस्थित होते. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत महिला मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्ह्यात स्वीप व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असून महिलांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे व आपल्या परिसरातील महिलांनादेखील मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन पुणे जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे यांन...
- Get link
- X
- Other Apps
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली माध्यम कक्षास भेट रायगड : प्रतिनिधी :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता ३२ रायगड लोकसभा मतदार संघासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण समिती आणि आणि माध्यम कक्ष (MCMC) जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग या कार्यालयात स्थापन करण्यात आला आहे. या कक्षास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी आज भेट देऊन कक्षाच्या कामकाजासंदर्भात माहिती घेतली. जिल्हाधिकारी जावळे यांनी या माध्यम कक्षातील इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया विभागांची पाहणी केली व आढावा घेतला. निवडणुकांमध्ये माध्यमांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे माध्यम कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी मोठी असून त्यांनी सतर्क व दक्ष राहून आपल्या जबाबदार्या पार पडाव्यात अशा सुचना श्री.जावळे यांनी दिल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे उपस्थित होते. यावेळी जिल्हा माहिती कार्यालय...
- Get link
- X
- Other Apps
परवानाधारकांना आचारसंहितेत शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध - जिल्हादंडाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांचे आदेश नागपूर : प्रतिनिधी :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक आचारसंहिता कालावधीत नागपूर जिल्हा व ग्रामीण भागातील शस्त्र परवाना धारकांना शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. सदर आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी निर्गमित केले. दिनांक 6 जून 2024 पर्यंत हे प्रतिबंध लागू राहतील. याचबरोबर शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 21 मधील तरतूदीनुसार शस्त्र परवान्यावर नोंदविलेले शस्त्रे जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जमा करण्याबाबत संबंधितांना कळविण्यात आले आहे. हा मनाई आदेश जो समाज दीर्घकालिन स्थायी कायदा, रुढी व परीपात यानुसार शस्त्रास्त्र बाळगण्यास हक्कदार आहे त्या समाजाला लागू असणार नाही. तथापि अशा समाजातील व्यक्ती हिंसाचारात सहभागी असल्याचे आढळून आल्यास, कायदा व सुव्यवस्था राखण्यास अडचण निर्माण करीत असल्याचे आढळून आल्यास, निवडणूक शांततेच्या मार्गाने पार पाडण्यास अडथळा निर्माण करीत असल्याचे आढळून आल्यास अशा व्यक्तीची शस्त्रास्त्र अडकावून ठेवण्यास जिल्हा प्रशासना...
- Get link
- X
- Other Apps
लोणेरे येथे बेकायदा मटका जुगार; पप्या-रवी चालवतात "बाबू ठाणा"चा अवैध धंदा प्रभारी पोलीस अधिकारी विजय सुर्वे घेतात हप्ता? रायगड (प्रतिनिधी) :- मुंबई गोवा महामार्गावरील लोणेरे येथे पेट्रोल पंपाजवळ एका सलूनच्या बाजूला "बाबू ठाणा" नावाच्या माणसाचा मटका जुगार राजरोसपणे सुरू असून पप्या आणि रवी नावाची माणसे हा अवैध धंदा चालवित असल्याचे दिसून आलेले आहे. येथील पोलीसच अवैध धंद्यांना साथ देत असल्यामुळे या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आलेली आहे. "बाबू ठाणा" नावाने ओळखल्या जाणाऱ्या माणसाचा बेकायदा मटका आणि जुगार क्लब मोठ्या जोमाने सुरू असून पप्या आणि रवी नावाची माणसे हा अवैध धंदा चालवित आहेत. येथील अवैध धंद्यांना गोरेगांव पोलीसांनी लाखो रूपयांचा हफ्ता घेऊन संरक्षण दिल्याने येथील अवैध धंदा राजरोसपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. या परिसरातील मटका जुगारामुळे येथील पोलीसांना लाखो रूपयांचा हफ्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध धंद्याविरूद्ध पोलीस कोणतीही कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. या परिसरात कायदा-सुव्यवस्था ढासळण्याची चिन्हे दिसू लागली ...
- Get link
- X
- Other Apps
गोरेगावमध्ये पोलीसांनी लाखो रूपयांचा हप्ता घेऊन सुरू ठेवलाय मटका जुगार प्रभारी पोलीस अधिकारी विजय सुर्वे घेतात मटका जुगाराचा हप्ता? रायगड (प्रतिनिधी) :- गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोरेगाव-म्हसळा रोडलगत सन्मान बार च्या बाजूला चिकन शॉपच्या बाजूला पोलीसांनी लाखो रूपयांचा हप्ता घेऊन बेकायदा मटका जुगाराला पाठबळ दिलेले असून यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. विनायक नावाच्या माणसाने हा अवैध धंदा सुरू ठेवलेला असून या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आली आहे. विनायक नावाच्या माणसाचा हा अवैध धंदा असल्याचे बोलले जात आहे. गोरेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी विजय सुर्वे यांनी हप्ता घेऊन या अवैध धंद्याला पाठबळ दिले आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर उपस्थित झालेला आहे. स्पष्टपणे दिसून येत आहे. गोरेगाव पोलीसांच्या आशिर्वादाने हा अवैध धंदा सुरू असल्यामुळे येथील पोलीसांनी हफ्ता घेऊन या बेकायदा धंद्याला पाठबळ दिल्याचे दिसून येत आहे. या परिसरात तरूण आणि वयोवृद्ध माणसे येथे मोठ्या प्रमाणात मटका खेळण्यासाठी येत असून या अव...
- Get link
- X
- Other Apps
पावणे दोन वर्षांत घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये सामान्य जनतेच्या हिताचे लोकाभिमुख निर्णय- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगेसोयरे व्याख्यासंदर्भातील अधिसूचनेवरील ४ लाख हरकतींची नोंद व छाननी पुर्ण मुंबई : प्रतिनिधी :- राज्य शासनाने गेल्या पावणे दोन वर्षांत आतापर्यंत घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये शेतकरी, कामगार, महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक असे सामान्य जनतेच्या हिताचे लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील जनहिताचे निर्णय घेतले असून त्यामध्ये कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर पद्धतीने लाभ देण्यासाठी ४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सगेसोयरे व्याख्यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेवर हरकती व सूचनांची छाननीची कार्यवाही सुरू असून ४ लाख हरकतींची नोंद व छाननी पुर्ण झाली आहे. येत्या चार महिन्यात यासंदर्भात कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमु...
- Get link
- X
- Other Apps
लोकसभा निवडणूक अनुषंगाने विविध परवानग्यांसाठी एक खिडकी कक्ष रायगड : प्रतिनिधी : - लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता विविध राजकीय पक्षांना, उमेदवारांना प्रचारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या, परवाने घ्यावे लागतात. या परवानग्या संबंधितांना तात्काळ उपलब्ध व्हाव्यात. यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. एक खिडकी योजना कार्यान्वित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्यानुसार एक खिडकी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाचे उपजिल्हाधिकारी डॉ.रविंद्र शेळके हे नोडल अधिकारी आहेत. एक खिडकी कक्षामध्ये परवानग्या, परवाने देणारे अधिकारी व परवानगीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत :- वाहन परवाना या साठी निवडणूक निर्णय अधिकारी/सहा, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा. यासाठी संबंधित राजकीय पक्षाचे अध्यक्ष किंवा सचिव व उमेदवाराचे बाबतीत उमेदवाराचे अधिकृत निवडणूक प्रतिनिधी किंवा स्वतः उमेदवार अर्ज करु शकतात. अर्जासोबत जोडावयाची काग...
- Get link
- X
- Other Apps
लोणेरे येथे बेकायदा मटका जुगाराचा धिंगाणा! पप्या-रवी चालवतात बाबू ठाणाचा अवैध धंदा गोरेगाव पोलीसांनी "११२ इमरजन्सी सर्विस" ला मारले फाट्यावर; स.पो.नि. विजय सुर्वे यांना लाखोंचा हप्ता? रायगड (प्रतिनिधी) :- मुंबई गोवा महामार्गावरील लोणेरे येथे पेट्रोल पंपाजवळ एका सलूनच्या बाजूला "बाबू ठाणा" नावाच्या माणसाचा मटका जुगार राजरोसपणे सुरू असून पप्या आणि रवी नावाची माणसे हा अवैध धंदा चालवित असल्याचे दिसून आलेले आहे. याप्रकरणी ११२ इमरजन्सी नंबरवर तक्रार करून देखील पोलीसांनी कारवाई केलेली नाही. गोरेगाव पोलीसांच्या आशिर्वादाने हा अवैध धंदा सुरू असल्याचे दिसून येत आहे. "बाबू ठाणा" नावाने ओळखल्या जाणाऱ्या माणसाचा बेकायदा मटका आणि जुगार क्लब मोठ्या जोमाने सुरू असून पप्या आणि रवी नावाची माणसे हा अवैध धंदा चालवित आहेत. येथील अवैध धंद्यांना गोरेगांव पोलीसांनी लाखो रूपयांचा हफ्ता घेऊन संरक्षण दिल्याने येथील अवैध धंदा राजरोसपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. या परिसरातील मटका जुगारामुळे येथील पोलीसांना लाखो रूपयांचा हफ्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध धंद्याविरूद्ध पोलीस कोण...
- Get link
- X
- Other Apps
गोरेगाव - म्हसळा मार्गावर बेकायदा मटका जुगार; पोलीसांना "विनायकाचा" आशिर्वाद? गोरेगाव पोलीसांनी "११२ इमरजन्सी सर्विस"ला मारले फाट्यावर; प्रभारी पोलीस अधिकारी विजय सुर्वे घेतात हप्ता? रायगड (प्रतिनिधी) :- गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोरेगाव-म्हसळा रोडलगत सन्मान बार च्या बाजूला विसावा हॉटेलसमोर, चिकनच्या दुकानाच्या बाजूला बेकायदा मटका जुगार सुरू असून यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. याप्रकरणी ११२ इमरजन्सी नंबरवर तक्रार केल्यानंतरही पोलीसांनी या अवैध धंद्यावर कारवाई केली नाही. विनायक नावाच्या माणसाने हा अवैध धंदा सुरू ठेवलेला असून या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आली आहे. विनायक नावाच्या माणसाचा हा अवैध धंदा असल्याचे बोलले जात आहे. गोरेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी विजय सुर्वे यांनी हप्ता घेऊन या अवैध धंद्याला पाठबळ दिले आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर उपस्थित झालेला आहे. स्पष्टपणे दिसून येत आहे. गोरेगाव पोलीसांच्या आशिर्वादाने हा अवैध धंदा सुरू असल्यामुळे येथील पोलीसांनी हफ्ता घेऊन या बेक...
- Get link
- X
- Other Apps
जिल्ह्यातील 1 लाख 70 हजार महिलांनी आमिषाला बळी न पडता मतदान करण्याची घेतली शपथ मतदान प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत व्यापक जनजागृतीवर भर - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा नागपूर : प्रतिनिधी :- सक्षम लोकशाहीसाठी मतदान प्रक्रियेत सर्वांचा सहभाग याला अनन्य साधारण महत्त्व आहे. मतदान प्रक्रियेत महिलांच्या मतदानाचे प्रमाण व उत्स्फूर्त सहभाग वाढावा यादृष्टीने स्वीप अंतर्गत व्यापक जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. यासाठी आज संपूर्ण जिल्हाभर ग्रामीण व शहरी भागात महिलांसाठी विशेष मोहीम घेण्यात आली होती. यात जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 70 हजार महिलांनी लोकशाहीला सशक्त व सक्षम करण्यासाठी भयमुक्त व शांततापूर्ण वातावरण जपून मतदानाचे पावित्र राखून कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत निहाय तर शहर व महानगरासाठी नगर परिषद, महानगरपालिकामार्फत वार्डनिहाय नियोजन केले होते. जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 41 गावांमधून या मोहिमेला उत्स्फूर्त सहभाग मिळाला. 15...
- Get link
- X
- Other Apps
आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रधुनाथ गावडे परभणी : प्रतिनिधी : - लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 च्या अनुषंगाने कालपासून आचारसंहिता लागू झाली असून, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. मतदार संघात कुठेही आचारसंहितेचा भंग झाल्यास तात्काळ गुन्हा दाखल करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजीत नोडल अधिकारी व विभागप्रमुखांच्या बैठकीत श्री. गावडे बोलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, अपर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, जालना जिल्ह्याचे अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक गणेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन वि...
- Get link
- X
- Other Apps
रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू रायगड लोकसभा मतदार संघांसाठी दि. 7 मे रोजी मतदान रायगड : प्रतिनिधी :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 48 लोकसभा मतदारसंघ असून 32 रायगड लोकसभा मतदार संघासाठी तिसऱ्या टप्प्यात दि 7 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 12 एप्रिल पासून सुरु होईल. जिल्ह्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर दिला जाणार असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी तथा रायगड लोकसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिप मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे 32- राय...
- Get link
- X
- Other Apps
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर पालनासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सातारा : प्रतिनिधी :- निवडणूक प्रक्रियेची व आदर्श आचारसंहितेचे कोटेकोर पालन करण्यासाठी आणि शांतता व सुव्यवस्था राखत पारदर्शी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. या बैठकीला पोलीस अधीक्षक समिर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, जिल्हा परिषदेचे वित्त व लेखाधिकारी राहूल कदम यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी निवडणूक खर्चाबाबतच्या कायदेशिर तरतुदींची माहिती राजकीय पक्षांना देवून त्याचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच विविध बाबींच्या दरपत्रकांवर यावेळी चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणूक उमेदवाराला 95 लाखापर्यंत खर्च करण्यास मुभा आहे. प्रत्येक तहसील कार्यालयांमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांना आवश्यक असणारे सर्व प्रकारचे परवाने घेण्यासाठी एक खिडकी योजना राबविण्यात येणार आह...
- Get link
- X
- Other Apps
निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू करा-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे पुणे : प्रतिनिधी :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असून स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या परिसरात निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आदी उपस्थित होते. डॉ.दिवसे म्हणाले, निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झाली असून ६ जूनपर्यंत ती लागू राहणार आहे. जिल्ह्यात दोन टप्प्यात मतदान होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी शासकीय-निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले भित्तीपत्रक, झेंडे, कटआऊट्स, संदेश काढून त्याचा अहवाल २४ तासात सादर करावा. भिंतीवरील रंगविलेल्या जाहिरातीदेखील काढण्यात याव्यात. शासकीय मैदाने, रस्ते, उद्याने, विद्युत ...
- Get link
- X
- Other Apps
चवदार तळ्याचे आंतरराष्ट्रीय महत्व लक्षात घेता कार्यक्रम दिमाखदार करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना रायगड : प्रतिनिधी :- ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचा 97 वा वर्धापन दि.20 मार्चला महाड येथे साजरा होत आहे. यानिमित्ताने शासकीय मानवंदना देण्यात येणार आहे. यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कार्यरत आहे. सर्व शासकीय यंत्रणाच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत घेतला. चवदार तळ्याचे आंतरराष्ट्रीय महत्व लक्षात घेता कार्यक्रमाचे नियोजन दर्जेदार व उत्कृष्ट करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिप मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, समाज कल्याण सहायक आयुक्त सुनील जाधव, उपविभागीय अधिकारी महाड ज्ञानोबा बानापुरे, उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नगरपरिषदेमार्फत चवदार तळे, भीमनगर, क्रांती स्तंभ, स्मारक परिसराची साफसफाई करण्यात यावी तसेच शहरातील विविध ठिकाणी विद्युत रोषणाई व सुशोभिकरण करावे. तसे...
- Get link
- X
- Other Apps
तलाठी पदभरती 2023 अंतर्गत 81 उमेदवारांना नियुक्ती आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी तत्पर कार्यवाही करत नियुक्ती आदेश केले निर्गमित परभणी : प्रतिनिधी : - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट "क" संवर्गातील तलाठी पदभरती सन 2023 जिल्हा आस्थापनेवर भरावयाच्या तलाठी संवर्गातील 95 पदांची भरती करण्यासाठी जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती. या जाहीरातीनुसार एकूण 21 हजार 433 उमेदवारांनी परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केले. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागा अंतर्गत जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे कार्यालयाकडून टीसीएस (TCS) कंपनीमार्फत दि. 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर, 2023 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. गुणवत्ता यादीनुसार प्रवर्गानिहाय तात्पुरत्या स्वरुपात निवड व प्रतिक्षा याद्या तयार करुन दि. 13 मार्च, 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदभरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्ती ही विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून 81 उमेदवारांना तलाठी पदावर नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. नियुक्ती देण्यात ...
- Get link
- X
- Other Apps
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे ‘राष्ट्रीय जन्मदोष जनजागरण’ महिन्याचा शुभारंभ संपन्न रायगड : प्रतिनिधी :- केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आज जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग डॉ.अंबादास देवमाने यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय जन्मदोष जनजागरण महिन्याचा ऑनलाईन पद्धतीने जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. दरवर्षी 3 मार्च रोजी जागतिक जन्म दोष दिन पाळला जातो व मार्च महिना हा राष्ट्रीय जन्म दोष जनजागरण महिना म्हणून साजरा केला जातो. यामध्ये सर्व जन्म दोषाबद्दल जागरूकता आणि काळजीसह उपचार पुरविण्याचे उद्दिष्ट आहे. यावर्षीची थीम “Breaking barriers- inclusive support for children with birth defect” अशी आहे. जगभरात दरवर्षी सहा टक्के बालक जन्मतःच दोष घेऊन जन्माला येतात. जन्म दोष हा अनुवांशिक जसे मातेचा मधुमेह आणि लट्ठपणा, मातेचे वय, व्हायरल इन्फेक्शन आणि मातृ स्थिती जसे कांजिण्या, रुबेला, झिका, पर्यावरणीय आणि औषधे यांच्याशी संबंधित असतो. आपल्या भावी पिढीवर जन्मजात दोषांचा काय परिणाम होतो याची जाणीव असल्याने केंद्रीय मंत्रालय, आरोग्य आणि कुटु...
- Get link
- X
- Other Apps
मतदारांच्या जाणीव जागृतीत शिक्षकांची भुमिका महत्त्वाची - जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी :- देशाची भावी पिढी घडवण्यामध्ये शिक्षकांचे महत्त्वाचे योगदान असते. मतदारांमध्ये मतदानासाठीची जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी शिक्षकांची भुमिका महत्त्वाची असते व ते काम शिक्षकांनी चोखपणे पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले. जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची आढावा बैठक आज वंदे मातरम सभागृहांमध्ये घेण्यात आली. स्वीप उपक्रमाअंतर्गत मतदार जाणीव जागृतीसाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, शिक्षणाधिकारी (माध्य)एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी (प्राथ)जयश्री चव्हाण, मनपा उपायुक्त पांढरे, ‘स्वीप’ नोडल अधिकारी सुदर्शन तुपे, शिक्षणाधिकारी (योजना) श्रीमती भूमकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, जि...