तलाठी पदभरती 2023 अंतर्गत 81 उमेदवारांना नियुक्ती आदेश
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी तत्पर कार्यवाही करत नियुक्ती आदेश केले निर्गमित
परभणी : प्रतिनिधी : - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट "क" संवर्गातील तलाठी पदभरती सन 2023 जिल्हा आस्थापनेवर भरावयाच्या तलाठी संवर्गातील 95 पदांची भरती करण्यासाठी जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती. या जाहीरातीनुसार एकूण 21 हजार 433 उमेदवारांनी परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केले. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागा अंतर्गत जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे कार्यालयाकडून टीसीएस (TCS) कंपनीमार्फत दि. 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर, 2023 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. गुणवत्ता यादीनुसार प्रवर्गानिहाय तात्पुरत्या स्वरुपात निवड व प्रतिक्षा याद्या तयार करुन दि. 13 मार्च, 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.
या पदभरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्ती ही विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून 81 उमेदवारांना तलाठी पदावर नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांचा तालूका निहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे. परभणी-14, पुर्णा- 10, पालम -8, गंगाखेड -9, सोनपेठ - 6, पाथरी -6, मानवत - 5, सेलु-8 आणि जिंतूर- 15.
सदर पदभरती तातडीने करण्याबाबत शासनाचे निर्देश होते. त्यानुसार जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी तत्पर कार्यवाही करुन तलाठी यांना नियुक्ती आदेश निर्गमित केले. तसेच अनुकंपा यादीतील 2 उमेदवारांना महसूल सहायक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, नायब तहसिलदार प्रशांत वाकोडकर यांच्यासह आस्थापना विभागातील कर्मचारी यांनी विशेष कार्य केले.
Comments
Post a Comment