गोरेगावमध्ये पोलीसांनी लाखो रूपयांचा हप्ता घेऊन सुरू ठेवलाय मटका जुगार
प्रभारी पोलीस अधिकारी विजय सुर्वे घेतात मटका जुगाराचा हप्ता?
रायगड (प्रतिनिधी) :- गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोरेगाव-म्हसळा रोडलगत सन्मान बार च्या बाजूला चिकन शॉपच्या बाजूला पोलीसांनी लाखो रूपयांचा हप्ता घेऊन बेकायदा मटका जुगाराला पाठबळ दिलेले असून यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत.
विनायक नावाच्या माणसाने हा अवैध धंदा सुरू ठेवलेला असून या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आली आहे. विनायक नावाच्या माणसाचा हा अवैध धंदा असल्याचे बोलले जात आहे. गोरेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी विजय सुर्वे यांनी हप्ता घेऊन या अवैध धंद्याला पाठबळ दिले आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर उपस्थित झालेला आहे. स्पष्टपणे दिसून येत आहे.
गोरेगाव पोलीसांच्या आशिर्वादाने हा अवैध धंदा सुरू असल्यामुळे येथील पोलीसांनी हफ्ता घेऊन या बेकायदा धंद्याला पाठबळ दिल्याचे दिसून येत आहे. या परिसरात तरूण आणि वयोवृद्ध माणसे येथे मोठ्या प्रमाणात मटका खेळण्यासाठी येत असून या अवैध धंद्याच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या बेकायदा मटका जुगारामुळे महिला वर्गातून देखील पोलीसांबद्दल नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि रायगड पोलीस अधीक्षक यांनी तातडीने या गंभीर समस्येची दखल घेऊन येथील मटका जुगाराविरूद्ध कारवाई करावी आणि या अवैध धंद्याला साथ देणाऱ्या पोलीसांवरही कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.
Comments
Post a Comment