पत्रकार प्रसाद गोरेगांवकर यांच्या प्रयत्नाना यश; गोरेगांवातील ती जागा सार्वजनिक बांधकाम विभागाचीच
गोरेगांव : प्रतिनिधी :- गोरेगांव गांव तलावालगत असलेली सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (सर्व्हे नं १९७) या जागेची काल दि. १८ मार्च २०२४ रोजी मोजणी करण्यात आली असून ही जागा सार्वजनिक बांधकाम खात्याचीच असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गोरेगांव गांव तलावाशेजारी अनाधिकृतपणे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेत बांधकाम करण्यात आले असून या जागेत अतिक्रमण करण्यात आले आहे. या जागेची मोजणी करुन हद्द कायम करण्याकरीता पत्रकार प्रसाद गोरेगांवकर यांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करुन
शासकीय जागा वाचविण्यासाठी दि. २६ जानेवारी २०२४ रोजी उपोषण देखील केले होते. या वेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता श्री. गणगणे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे काल दि. १८ मार्च रोजी मोजणी करण्यात आली. या मोजणी दरम्यान सदर जागा सार्वजनिक बांधकाम खात्याचीच असल्याचे सिद्ध झाले असून शासकीय जागा वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नात यशस्वी झाल्याने पत्रकार प्रसाद गोरेगांवकर यांचे गोरेगांवात कौतुक होत आहे.
या मोजणी दरम्यान सार्वजनिक बांधकाम उपविभाग माणगांवचे सहाय्यक अभियंता व शिपाई तसेच समिर कर्देकर, अमजद अधिकारी, फैझान काझी, उमेश लाड, पत्रकार रिजवान मुकादम व प्रसाद गोरेगांवकर उपस्थित होते.
Comments
Post a Comment