माणगाव - निजामपूर मार्गावर "अविनाश" चा जुगार क्लब; माणगाव पोलीसांना लाखो रूपयांचा हप्ता?
रायगड: प्रतिनिधी :- माणगाव - निजामपूर मार्गावर चव्हाणवाडी च्या हद्दीत एका हॉटेलच्या वर रूममध्ये बेकायदा जुगार क्लब राजरोसपणे सुरू असून या जुगार क्लबमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. परंतु पोलीसांनी मात्र हप्ता घेऊन या बेकायदा जुगार क्लबला पाठबळ दिल्याचे स्पष्ट होत चालले आहे.
हप्ता घेऊन अवैध जुगार क्लब ला पाठींबा देणाऱ्या पोलीसांवर कारवाई कधी होणार? असा सवाल या परिसरातील सूज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांनी हा अवैध जुगार क्लब तातडीने बंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे.
माणगाव - निजामपूर मार्गावरील चव्हाणवाडी च्या हद्दीत अविनाश नावाच्या माणसाचा हा जुगार क्लब चालू असल्याचे निदर्शनास आलेले आहे. या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. अनेक तरूण व वयोवृद्ध माणसे त्यांचा महिन्याचा पगार या जुगारामध्येच खर्च करीत असून अनेकांच्या कुटूंबात वाद-भांडणे सुरू असल्याचे दिसत आहे. या जुगारामध्ये एक वेळा योगायोगाने जिंकलेली व्यक्ती पुन्हा-पुन्हा जिंकण्याच्या आशेने आपली मेहनतीची कमाई वारंवार यामध्येच घालवित असल्याचे दिसत आहे. सदरचा बेकायदा धंदा या परिसरात राजरोसपणे सुरू असल्यामुळे या परिसरात कायदा व सुव्यस्था आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक व महिला वर्गासमोर उभा आहे
Comments
Post a Comment