कोलाड लायन्स क्लबच्या सामाजिक बांधिलकीतून मुठवली खुर्द येथे उभारलेल्या सार्व. शौचालयाचे उद्घाटन.
कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण):- रोहा तालुक्यातील मौजे मुठवली येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आराध्य दैवत भक्तांच्या हाकेला धावणारी नवसाला पावणारी मनातील भक्तांना कौल देणारी देवी आई रत्नाई (भवानी माता) मंदिर सभागृह परीसरात येथे श्रध्देने येणाऱ्या भक्तांसाठी सुसज्ज असे शौचालय लायन्स क्लब ऑफ कोलाड- रोहा यांच्या सामाजिक बांधिलकीतून उभारण्यात आला असुन त्याचे उद्घाटन सोहळा शुक्रवारी 22 मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल 3231 ए 4 लायन्स क्लब ऑफ कोलाड - रोहा यांच्या वतीने तसेच
जिल्हा उप प्रांतपाल एम जे एफ लायन संजीव सुर्यवंशी,लायन प्रवीण सरनाईक,लायन डॉ नमिता मिश्रा मैडम,लायन महेश सावंत,लायन विजय कुमार गणात्रा,लायन रविंद्र घरत सर,लायन डॉ यशवंत चित्रे, लायन आर.पी.पांडे,लायन अरविंद घरत,लायन प्रियदर्शनी पाटील,कला प्रिंटर ,ऐरोली क्लब, अलिबाग क्लब,कोलाड लायन्स मेंबर्स यांच्या विशेष सौजन्याने तसेच ग्रामस्थ मुठवली खुर्द,ग्राम पंचायत मालसई यांच्या सहकार्याने येथे उभारण्यात आलेल्या एक लाख नव्वद हजार रुपये खर्च करून भव्य दिव्य आणि सुसज्ज बांधण्यात आलेल्या शौचालयाचे उद्घाटन यावेळी लायन्स क्लबचे माजी जिल्हा प्रांतपाल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पीएमजेएफ लायन अनिल जाधव जिल्हा उप प्रांतपाल पीएमजेएफ लायन एन आर परमेश्वरन उप प्रांतपाल एमजेएफ लायन संजीव सुर्यवंशी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३१ ए ४ रिजन पाच झोन टू यांच्या आशीर्वादाने तसेच लायन्स क्लब ऑफ कोलाड - रोहा यांच्या वतीने तसेच क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ सागर सानप क्लबचे मार्गदर्शक लायन रविंद्र घरत पराग फुकने यांच्या संकल्पनेतून कोलाड येथील व्हिजन सेंटर पाठोपाठ क्लबच्या वतीने महत्वपूर्ण असा दुसरा पर्मनंट प्रोजेक्ट मुठवली ग्रामस्थ व महीला यांचे सहकार्याने जय भवानी माता मंदिर सभागृह परीसरात स्त्रियांसाठी, आणि पुरुषांसाठी बांधण्यात आलेल्या सार्व. स्वच्छ्ता ग्रह आणि शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी लायन रिजन चेअर पर्सन लायन प्रियदर्शनी पाटील,झोन चेअर पर्सन लायन डॉ यशवंत चित्रे,लायन प्रवीण सरनाईक,लायन डॉ नमिता मिश्रा,लायन मिश्रा ,लायन विजय कुमार गणत्रा,लायन सौ सरनाईक,लायन सौ गांधी,लायन रविंद्र घरत, रोहा क्लबच्या अध्यक्षा लायन सौ सुश्मिता शिट्याळकर,लायन पराग फुकने,कोलाड लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन नरेश बिरगावले, सेक्रेटरी अनिल महाडिक,उपाध्यक्ष डॉ विनोद गांधी,डॉ श्याम लोखंडे,रविंद्र लोखंडे,बोर्ड ऑफ डायरेक्टर सौ पूजा लोखंडे,महेश तुपकर,सह खजिनदार रजेंदर कोप्पु, दिनकर सानप,विश्वास निकम, विठ्ठल सावळे, लिओ लायन प्रसाद लोखंडे,गावचे पोलिस पाटील राम सावंत, मंदिराचे पुजारी सुदाम शिंदे ,मारुती तुपकर, हेमंत मालुसरे,आदी ग्रामस्थ व महीला मंडळ बहुसंख्येने उपस्थीत होते.
रोहा तालुक्यातील कोलाड विभागात कोलाड लायन्स क्लब ही समाज सेवी संस्था गेली तीन वर्ष विविध क्षेत्रात अग्रेसर काम करत आहे.या अनुषंगाने सामाजिक बांधिलकीतून लायन्स क्लब ऑफ इंटनॅशनल 3231 ए 4 चे डिस्ट्रिकचे द्वितीय उप प्रांतपाल यांच्या वतीने व कोलाड क्लब च्या विशेष सौजन्याने तालुक्यातील मौजे देवीची मुठवली येथे श्रद्धाळू भक्तांची समस्या लक्षात घेऊन तसेच ग्रामस्थानी केलेला पाठपुरावा या अनुषंगाने या ठिकाणी सुसज्ज शौचालय बांधण्यात आले याचा द्विगुणि आनंद मान्यवरांनी व्यक्त करत कोलाड कोलाड क्लब या ग्रामीण आणि दुर्गम भागात नागरिकांच्या मुलभत समस्यांवर उत्तम कार्य करत असल्याचे मनोगत उपस्थित मान्यवरांनी केले.
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन रविंद्र लोखंडे यांनी केले तर प्रास्तविक अध्यक्ष नरेश बिरगावले यांनी केले तर प्रमुख मान्यवर लायन अनिल जाधव,एन आर परमेश्वरन,संजीव सुर्यवंशी, प्रियदर्शनी पाटील, डॉ यशवंत चित्रे, रविंद्र घरत,यांनी मौलिक मार्गदर्शन केले तसेच ग्रामस्थ म्हणून हभप राम सावंत यांनी लायन्स क्लबने गावांसाठी केलेले हे महान कार्य असल्याचे सांगत ऋण व्यक्त केले तर शेवटी लायन डॉ श्याम लोखंडे यांनी आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Comments
Post a Comment