लोणेरे पेट्रोलपंपाजवळ आणि गोरेगावमध्ये बेकायदा मटका जुगार राजरोसपणे सुरू
लोणेरे मध्ये बाबूठाणा, पप्या, रवी, गोरेगाव मध्ये विनायक भाऊचा मटका जुगार जोरात
स.पो.नि. विजय सुर्वे यांना लाखो रूपयांचा हप्ता?
रायगड : प्रतिनिधी :- मुंबई गोवा महामार्गावरील लोणेरे येथे पेट्रोल पंपाजवळ एका सलूनच्या बाजूला "बाबू ठाणा" नावाच्या माणसाचा मटका जुगार राजरोसपणे सुरू असून गोरेगावमध्ये गोरेगाव-म्हसळा रोडलगत सन्मान बार च्या बाजूला चिकन शॉपच्या बाजूला अवैध मटका जुगाराचा धंदा सुरू असून गोरेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी यांनी या अवैध धंद्यांना पाठबळ दिल्याचे स्पष्ट होत चालले आहे.
लोणेरे येथे पप्या आणि रवी नावाची माणसे हा अवैध धंदा चालवित असल्याचे दिसून आलेले आहे. तसेच गोरेगाव येथे येथे विनायक नावाच्या माणसाचा हा अवैध धंदा असून दोन्ही ठिकाणी मटका खेळण्यासाठी गर्दी होण्याचा प्रकार दिसून आलेला असून या गर्दीमुळे येथे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला असून पोलीसच अवैध धंद्यांना साथ देत असल्यामुळे या परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊन आचारसंहितेचा भंग होऊ लागला आहे. येथे बेकायदा मटका आणि जुगार क्लब मोठ्या जोमाने सुरू असून या अवैध धंद्यांना गोरेगांव पोलीसांनी लाखो रूपयांचा हफ्ता घेऊन संरक्षण दिल्याने येथील अवैध धंदा राजरोसपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. या परिसरात अवैध धंद्यांमुळे कायदा-सुव्यवस्था ढासळण्याची चिन्हे दिसू लागली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. तरूण आणि वयोवृद्ध माणसे येथे मोठ्या प्रमाणात मटका खेळण्यासाठी खेळण्यासाठी येत असून या अवैध धंद्याच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. येथे आचारसंहितेचा भंग होण्याचा प्रकार घडत असल्यामुळे निवडणूक आयोगाकडून याप्रकरणी कडक कारवाई होणे गरजेचे आहे.
Comments
Post a Comment