कोलाड जवळ रेल्वेच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

 कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण):-  रोहा तालुक्यातील कोलाड रेल्वे हद्दीतील रेल्वे रुळावर किमी नंबर १०/१२ जवळ एका तरुणाला रेल्वेची धडक लागून या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

 पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार सोमवार दि.२५/३/२०२४ रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास कोलाड रेल्वे रुळावर किमी नंबर १०/१२ जवळ पाले खुर्द येथील विशाल बाळकृष्ण जाधव वय वर्षे ३० याचा या रेल्वे रुळावरून जाणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेस लोकमान्य टिळक तर्मिनल ते थिरूअनंतपुरम गाडी नं.१६३४५ या गाडीने धडक दिल्याने या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असुन कोलाड पोलीस ठाण्यात याची आकस्मित मृत्यू अशी नोंद झाली असुन याचा अधिक तपास मपोना /१७७ एन.ए. शिर्के करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog