कर्जत येथील हत्याकांडातील दोन आरोपींना अटक 

रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक

कामगिरी

कर्जत : पंकेश जाधव :- कर्जत येथील हत्याकांडातील दोन आरोपींना अटक करण्याची धडक कामगिरी रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे.

कर्जत कडून मुरबाडकडे जाणाऱ्या रोडवर कशेळे गावच्या पुढे अबासा फार्म हाउस पासून काही अंतरावर जंगल असलेल्या निर्जळस्थळी रोडच्या बाजूला एक 25 ते 27 वर्षे वयाचा अनोळखी इसमाने दोन्ही हात पाठीमागे व दोन्ही पाय बांधून गळा कापून निर्घुण खून केल्याच्या अवस्थेत रोडच्या बाजूला पडल्याची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग श्री. धुळा टेळे यांनी भेट देवून शहानिशा केली त्यानंतर खबर देणारे इसम नामे श्री. महादेव संभाजी म्हसे यांची प्रथम खबरी फिर्याद घेवून कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं.57/2024 भा.दं.वि.क.302 अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिली. सदर माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे व पथकासह तात्काळ घटनास्थळी भेट देवून तपास चालू केला.

पोलीसांपुढे सदर मयताचे ओळख पटविण्याचे आव्हान होते. सदरवेळी मयत इसमाचे फोटो प्राप्त करण्यात आले. सदर फोटोवरून सदरचा इसम हा आसाम, मिजोरम, सिक्कीम, नेपाळ येथील रहिवाशी असलेबाबत दिसून येत होते तसेच मयताचे अज्ञात आरोपितानी हात व पाय बांधण्यासाठी वापरलेले कपड्यावर काही खुणा होत्या. त्याआधारे तपास करीत असताना सदर मयत इसम हा नेपाळ येथून कामधंदानिमित्त  पनवेल येथे आल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली व तो वेगवेगळ्या हॉटेल मध्ये कॅटरर्सचे काम रोजनदारीने करीत असल्याची माहिती प्रप्त झाली. परंतु त्याचे नाव, राहण्याचे ठिकाण, पूर्ण मूळ गावचा पत्ता मिळून येथ नव्हता. परंतु सदर पथकाने अथकपणे दिवसरात्र आपले कौशल्य पणाला लावून तपास केला. सदर तपासादरम्यान मयत इसमाला ओळखणारा व त्यास वेगवेगळ्या हॉटेल मध्ये कॅटरर्सच्या कामावर मजुरीने लावणारा लेबर कॉन्टक्टर दिलीप धनसानी यास पनवेल येथून ताब्यात घेवून चौकशी केली. परंतु तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानेच व त्याचे सहकारी आरोपी 2) विजय रोळी वाघरी वय-38 वर्षे, रा. नवनाथ मंदिर नवनगर झोपडपट्टी स्टेशन रोड पनवेल यांनी मिळून त्याचे पूर्व वैमनुष्यातून मयताला दारू पाजून रिक्षाने नेरळच्या जंगलात प्रथम त्याचे हात पाठीमागे व दोन्ही पाय बांधून धारदार शस्त्राने गळा कापून निर्घुण खून करून रिक्षाने त्याचा मृतदेह वर नमूद ठिकाणी निर्जळ स्थळी जंगलात फेकून दिल्याचे सांगितले .

आरोपींची नावे 1) दिलीप रसिक धनसानी वय 35 वर्षे रा. लेबर कॅम्प, संजय गांधीनगर TH कटारिया मार्ग माटुंगा मुंबई आणि 2) विजय रोळी वाघरी वय 38 वर्षे रा.नवनाथ मंदिर नवनगर झोपडपट्टी स्टेशन रोड पनवेल यांना त्याब्यात घेऊन त्यांनी वापरलेली रिक्षा ताब्यात घेण्यात आली आहे. सदर दोन आरोपी व रिक्षा पुढील तपासासाठी कर्जत पोलीस यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. खून झालेला मयत इसम याची ओळख नसताना त्याची ओळख पटवून तपासाचे कौशल्यपणाला लावून रायगड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सपोनि/संदीप पोमण व पथकाने अहोरात्र मेहनत करून सदरचा गुन्हा उघड केला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे,  स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, स.फौ. प्रसाद पाटील, पो.ह. प्रतिक सावंत, पो.ह. राजेश पाटील, पो.ह. संदीप पाटील, पो.ह. यशवंत झेमसे, पो.ह. राकेश म्हात्रे पोना सचिन वावेकर, अक्षय जगताप व सायबर पोलीस ठाण्यातील, पो.ना. तुषार घरत, पो.ना. अक्षय पाटील यांनी गून्ह्याच्या तपासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

Comments

Popular posts from this blog