आंबेवाडी जि. प. मध्ये भाजपा तालुका अध्यक्ष युवा मोर्चा श्री.महेशदादा ठाकुर यांनी शिवजयंती निमित्ताने विविध गावात भेटी दिल्या.
रोहा : प्रमोद गायकवाड :- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने भाजपा रोहा तालुका अध्यक्ष युवा मोर्चा श्री. महेश दादा ठाकुर यांनी आंबेवाडी जिल्हा परिषद मतदार संघातील नडवली, घेरासुरगड वैजनाथ, कोलाड, पालेखुर्द, तसेंच श्री चंद्रकांत लोखंडे आयोजित छत्रपती शिवजयंती उत्सव आंबेवाडी या ठिकाणी भेटी दिल्या,
घेरासुरगड व नडवली गावातील यंदा शिवजयंती उत्सव विशेष होता कारण छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नवीन तयार केले आहे त्यामुळे त्या गावातील ग्रामस्थ व महिला व युवा वर्ग यांचा उत्साह मोठा होता यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष युवा मोर्चा महेशदादा ठाकुर यांनी सर्वांशी संवाद साधला.
यावेळी जेष्ठ नेते संजय लोटनकर,जेष्ठ नेते माजी सरपंच रघुनाथ कोस्तेकर, जेष्ठ नेते शांताराम माने, वरसगांव बुथ प्रमुख रवींद्र शिंदे, रोहा तालुका मीडिया संयोजक कल्पेश माने, नडवली गावाचे युवा कार्यकर्ते ऋतिक ढोकरे उपस्थित होते.
Comments
Post a Comment