आंबेवाडी येथील गोडया नदीच्या पाण्यात बुडून अनोख्या इसमाचे मृत्यू
कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण):- बुधवार दि.१३ मार्च २०२४ रोजी सकाळी ८.०० वाजण्याच्या दरम्यान आंबेवाडी गावाच्या हद्दीतील कोलाड हायस्कूलच्या पुढे असणाऱ्या ब्रिजच्या खालून वाहणाऱ्या गोडया नदीच्या पाण्यात बुडून एका अनोख्या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
सदरची माहिती मिळताच कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली परंतु मृत्यूचे कारण समजु शकले नाही मयत इसमाची ओळख पटली नसुन सदर कोलाड पोलिस ठाण्यात अ.मृ. रजि. नं. व ४/२०२४ सिआरपीसी कलम १७४ नुसार आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. असुन अधिक तपास कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार पोसई चौधरी, पो.हवालदार गायकवाड करीत आहेत
Comments
Post a Comment