हेटवणे येथील विजय निकम यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात राज्य मंत्री आदितीताई तटकरे व आ. अनिकेत तटकरे यांची उपस्थिती
कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण) :- हेटवणे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय निकम यांच्या मुलीला आशिर्वाद देण्यासाठी राज्यमंत्री तथा लोकप्रिय महिला व बाल विकास मंत्री नामदार आदितीताई सुनील तटकरे व माननीय आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी उपस्थिती दर्शविली व शुभ आशिर्वाद दिले.
रविवार दिनांक ३/३/२०२४ रोजी हेटवणे गावचे सुपुत्र विजय दत्ताराम निकम. यांच्या राहत्या घरी.. विजय निकम यांची मुलगी कोमल हिला आशिर्वाद देण्यासाठी आले होते.त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी मुलगा अजय निकम.भाऊ संजय निकम.संतोष निकम.स्वराज निकम.गजानन मोरे.व इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी मंत्री आदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांचे श्री.विजय निकम.यांनी शाल श्रीफळ देऊन दोन्ही मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
निवडणूकीची धावपळ चालू असताना वेळात वेळ काढून भाई.तटकरे व ताई नववधूला आशिर्वाद देण्यासाठी आल्यामुळे श्री.विजय निकम.यांनी भाईंचे व ताईचे स्वागत करुन मनोभावे आभार मानले.
Comments
Post a Comment