लोणेरे येथे बेकायदा मटका जुगार; पप्या-रवी चालवतात "बाबू ठाणा"चा अवैध धंदा
प्रभारी पोलीस अधिकारी विजय सुर्वे घेतात हप्ता?
रायगड (प्रतिनिधी) :- मुंबई गोवा महामार्गावरील लोणेरे येथे पेट्रोल पंपाजवळ एका सलूनच्या बाजूला "बाबू ठाणा" नावाच्या माणसाचा मटका जुगार राजरोसपणे सुरू असून पप्या आणि रवी नावाची माणसे हा अवैध धंदा चालवित असल्याचे दिसून आलेले आहे. येथील पोलीसच अवैध धंद्यांना साथ देत असल्यामुळे या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आलेली आहे.
"बाबू ठाणा" नावाने ओळखल्या जाणाऱ्या माणसाचा बेकायदा मटका आणि जुगार क्लब मोठ्या जोमाने सुरू असून पप्या आणि रवी नावाची माणसे हा अवैध धंदा चालवित आहेत. येथील अवैध धंद्यांना गोरेगांव पोलीसांनी लाखो रूपयांचा हफ्ता घेऊन संरक्षण दिल्याने येथील अवैध धंदा राजरोसपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. या परिसरातील मटका जुगारामुळे येथील पोलीसांना लाखो रूपयांचा हफ्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध धंद्याविरूद्ध पोलीस कोणतीही कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. या परिसरात कायदा-सुव्यवस्था ढासळण्याची चिन्हे दिसू लागली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. तरूण आणि वयोवृद्ध माणसे येथे मोठ्या प्रमाणात मटका खेळण्यासाठी खेळण्यासाठी येत असून या अवैध धंद्याच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या बेकायदा मटका जुगारामुळे महिला वर्गातून देखील पोलीसांबद्दल नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
Comments
Post a Comment