लोकसभा निवडणूक अनुषंगाने विविध परवानग्यांसाठी एक खिडकी कक्ष

रायगड : प्रतिनिधी : - लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता विविध राजकीय पक्षांना, उमेदवारांना प्रचारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या, परवाने घ्यावे लागतात. या परवानग्या संबंधितांना तात्काळ उपलब्ध व्हाव्यात. यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी  कार्यालयात एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.

एक खिडकी योजना कार्यान्वित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्यानुसार  एक खिडकी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाचे उपजिल्हाधिकारी डॉ.रविंद्र शेळके हे नोडल अधिकारी आहेत.

एक खिडकी कक्षामध्ये परवानग्या, परवाने देणारे अधिकारी व परवानगीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत :-

वाहन परवाना

या साठी निवडणूक निर्णय अधिकारी/सहा, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा. यासाठी संबंधित राजकीय पक्षाचे अध्यक्ष किंवा सचिव व उमेदवाराचे बाबतीत उमेदवाराचे अधिकृत निवडणूक प्रतिनिधी किंवा स्वतः उमेदवार अर्ज करु शकतात.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे- विहित नमुन्यातील अर्ज, अर्जदाराचे आधारकार्ड सत्यप्रत, वाहन नोंदणी परवाना सत्यप्रत, उमेदवाराचा नमुना नं.16 खर्चाबाबतची माहिती सत्यप्रत.

लाऊडस्पीकर परवाना- अर्ज पोलीस निरीक्षक (एका पोलीस स्टेशन हदीत असल्यास), उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे करावा (दोन पोलीस स्टेशन हद्दीत असल्यास),

 संबंधित राजकीय पक्षाचे अध्यक्ष किंवा सचिव व उमेदवाराचे बाबतीत उमेदवाराचे अधिकृत निवडणूक प्रतिनिधी किंवा स्वतः उमेदवार अर्ज करु शकतात.

 ऑनलाईन स्पीकर परवाना अर्ज कसा करावा, स्पीकर परवाना अर्ज www/home.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर करावा, नागरीक ऑनलाईन पावर क्लीक करावे,  नवीन यूजर आयडी येथे नोंदणी करावी, आपाल्या मोबाईल नंबरवर ओटीपीव्दारे पडताळणी करून युजर आयडी आणि पासवर्ड बनविणे, ऑनलाईन सेवेचा अर्ज भरताना इतर आवश्यक पुराव्यांसह फोटो, ओळखीचा पुरावा व पत्यांचा पुरावा जोडावा लागेल (उदा. आधारकार्ड, लायसन्स, मतदानकार्ड),  कोणत्या कारणासाठी स्पीकर परवाना पाहिजे वेळ, दिनांक, ठिकाण, आयोजकाचे नाव यांचा स्पष्ट उल्लेख असावा, सदर कागदपत्राची पडताळणी करुन पोलीस स्टेशन येथे ऑनलाईन परवाना प्रत दिली जाईल.

सभा, मेळावे इत्यादी परवानगीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी/ सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा,  संबंधित राजकीय पक्षाचे अध्यक्ष किंवा सचिव व उमेदवाराचे बाबतीत उमेदवाराचे अधिकृत निवडणूक प्रतिनिधी किंवा स्वतः उमेदवार अर्ज करु शकतात.

अर्जासोबत संबंधित पोलीस विभागाकडील ना हरकत प्रमाणापत्र बंधनकारक, जागा मालकाची ना-हरकत, स्थानिक स्वराज्य संस्थेची ना हरकत (जागा अतिक्रमण, धार्मिक स्थळ, शाळा / महाविद्यालये, रुग्णालय नसावे) ही कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

प्रचार कार्यालय उघडण्यास परवानगीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी/सहा.निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा, संबंधित राजकीय पक्षाचे अध्यक्ष किंवा सचिव व उमेदवाराचे बाबतीत उमेदवाराचे अधिकृत निवडणूक प्रतिनिधी किंवा स्वतः उमेदवार  अर्ज करु शकतात. अर्जासोबत प्रचार कार्यालयासाठी संबंधित इमारत मालक यांचे संमतीपत्र,  प्रचार कार्यालयासाठी संबंधित नगरपालिका/ ग्रामपंचायत यांच्याकडील ना हरकत दाखला ही कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

मिरवणूक,रॅली परवानगीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा, संबंधित राजकीय पक्षाचे अध्यक्ष किंवा सचिव व उमेदवाराचे बाबतीत उमेदवाराचे अधिकृत निवडणूक प्रतिनिधी किंवा स्वतः उमेदवार  अर्ज करु शकतात. यासाठी संबंधित पोलीस विभागाकडील ना-हरकत प्रमाणपत्र बंधनकारक आहे. 

रोड शो साठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहा.निवडणूक अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा, संबंधित राजकीय पक्षाचे अध्यक्ष किंवा सचिव व उमेदवाराचे बाबतीत उमेदवाराचे अधिकृत निवडणूक प्रतिनिधी किंवा स्वतः उमेदवार  अर्ज करु शकतात. यासाठी संबंधित पोलीस विभागाकडील ना-हरकत प्रमाणपत्र बंधनकारक आहे. 

हेलिकॉप्टर लँडींग परवानासाठी जिल्हादंडाधिकारी (राजशिष्टाचार शाखा), संबंधित पोलीस अधिकारी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे अर्ज करावा, संबंधित राजकीय पक्षाचे अध्यक्ष किंवा सचिव व उमेदवाराचे बाबतीत उमेदवाराचे अधिकृत निवडणूक प्रतिनिधी किंवा स्वतः उमेदवार  अर्ज करु शकतात. मा. जिल्हादंडाधिकारी यांच्याकडील ना हरकत दाखला,पोलीस अधिक्षक यांचे अभिप्राय ही कागदपत्रे अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.

मैदान वापर परवानगीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा, संबंधित राजकीय पक्षाचे अध्यक्ष किंवा सचिव व उमेदवाराचे बाबतीत उमेदवाराचे अधिकृत निवडणूक प्रतिनिधी किंवा स्वतः उमेदवार  अर्ज करु शकतात.

संबंधित मैदान मालक यांचे संमतीपत्र, मैदान संबंधित नगरपालिका/ग्रामपंचायत यांच्याकडील ना हरकत दाखला अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.

Comments

Popular posts from this blog