पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या  सफाई सेवकांकडून मतदानाची शपथ

पुणे : प्रतिनिधी :-  आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत असून त्याअंतर्गत भोसरी विधानसभा मतदार संघात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सफाई सेवकांना मतदानाची शपथ देण्यात आली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयामार्फत विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमात इंद्रायणीनगर, चिखली, जाधववाडी, अंकुशराव लांडगे सभागृह या परिसरातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सुमारे ५०० सफाई सेवकांनी मतदानाची शपथ घेतली. यावेळी क क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, भोसरी विधानसभा मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी तानाजी दाते उपस्थित होते.

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत महिला मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्ह्यात स्वीप व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असून महिलांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे व आपल्या परिसरातील महिलांनादेखील मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन पुणे जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog