लोणेरे येथे बेकायदा मटका जुगाराचा धिंगाणा! 

पप्या-रवी चालवतात बाबू ठाणाचा अवैध धंदा 

गोरेगाव पोलीसांनी "११२ इमरजन्सी सर्विस" ला मारले फाट्यावर; स.पो.नि. विजय सुर्वे यांना लाखोंचा हप्ता?

रायगड (प्रतिनिधी) :-  मुंबई गोवा महामार्गावरील लोणेरे येथे पेट्रोल पंपाजवळ एका सलूनच्या बाजूला "बाबू ठाणा" नावाच्या माणसाचा मटका जुगार राजरोसपणे सुरू असून पप्या आणि रवी नावाची माणसे हा अवैध धंदा चालवित असल्याचे दिसून आलेले आहे. याप्रकरणी ११२ इमरजन्सी नंबरवर तक्रार करून देखील पोलीसांनी कारवाई केलेली नाही. गोरेगाव पोलीसांच्या आशिर्वादाने हा अवैध धंदा सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

"बाबू ठाणा" नावाने ओळखल्या जाणाऱ्या माणसाचा बेकायदा मटका आणि जुगार क्लब मोठ्या जोमाने सुरू असून पप्या आणि रवी नावाची माणसे हा अवैध धंदा चालवित आहेत. येथील अवैध धंद्यांना गोरेगांव पोलीसांनी लाखो रूपयांचा हफ्ता घेऊन संरक्षण दिल्याने येथील अवैध धंदा राजरोसपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. या परिसरातील मटका जुगारामुळे येथील पोलीसांना लाखो रूपयांचा हफ्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध धंद्याविरूद्ध पोलीस कोणतीही कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. या परिसरात कायदा-सुव्यवस्था ढासळण्याची चिन्हे दिसू लागली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. तरूण आणि वयोवृद्ध माणसे येथे मोठ्या प्रमाणात मटका खेळण्यासाठी खेळण्यासाठी येत असून या अवैध धंद्याच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या बेकायदा मटका जुगारामुळे महिला वर्गातून देखील पोलीसांबद्दल नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

Comments

Popular posts from this blog