Posts

Showing posts from April, 2024
Image
  मुंबई-गोवा हायवेवरील वाहतूक कोंडीचा तिडा सुटता सुटेना, प्रवाश्यांचा खोलंबा प्रचंड उकाड्याचा करावा लागत आहे सामना  कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण):- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड  इंदापूर व माणगाव दरम्यानच्या चौपदरी करणाचे काम  अदयाप ही अर्धवट स्थितीत असल्यामुळे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असुन यामुळे वाहतूक कोंडी ही निर्माण होत असुन यामुळे प्रवाश्यांचा खोलंबा होतांना दिसत असुन यामुळे वाहने तासंतास उभी करावी लागत असल्यामुळे प्रवाश्यांना प्रचंड उखाड्याचा सामना करावा लागत आहे.  शनिवार व रविवार नोकरदारांना असणाऱ्या सुट्टया व शालेय विद्यार्थ्यांना शाळेला पडलेल्या सुट्ट्या, तlसेच सुरु झालेली लग्न सराई यामुळे मुंबई-गोवा हायवे वर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. परंतु कोलाड, इंदापूर व माणगाव मधील रस्त्याचे काम पंधरा वर्षांपासून अर्धवट स्थितीत असुन अद्यापही या कामात प्रगती नाही या दोन्ही बाजारपेठेतील रस्ता अरुंद असल्यामुळे दररोज वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.  सर्व लोकनेते मात्र आपापल्या खुर्ची साठी प्रचारात गुंतले आहेत परंतु अश...
  दारू पियुन रेल्वे पुलावरून तोल गेल्याने तरुणाचा मृत्यू  कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण) मुंबई-गोवा हायवेवरील कोलाड कोकण रेल्वे ब्रिज वरुन दारू पियुन तोल गेल्याने ब्रिजच्या खाली पडून तरुणाचा दुर्दैवी अंत झाला असल्याची घटना घडली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार शनिवार दि.२७/४/२०२४ रोजी २.५३ वा संत रोहिदास नगर कोलाड येथील अभिषेक रविंद्र जानवरकर वय वर्षे ३० यांनी कोकण रेल्वे ब्रिजवर दारू पियाला असता त्याचा दारूच्या नशेत तोल जाऊन तो खाली पडून ब्रिजच्या खाली असलेल्या खडी व दगडावर आपटून त्याच्या कपाळाला व नाकातोंडा वाटे रक्त येऊन गंभीर स्वरूपाची दुखापत होऊन मयत झाला असुन याचा अधिक तपास कोलाड पोलीस ठाण्याचे पोहवा एस जे मोरे हे करीत आहेत
Image
  शिवगर्जना मित्र मंडळातर्फे श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहने साजरा तळा : नजीर पठाण :- रायगड जिल्ह्यामधील तळा तालुक्यातील वृंदावन(भानंग कोंड) या गावामध्ये शिवगर्जना मित्र मंडळ यांच्यातर्फे २२ एप्रिल व २३एप्रिल २०२४  रोजी आयोजित करण्यात आलेला हनुमान जयंती उत्सव- २०२४ मोठ्या उत्साहामध्ये व जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला.या उत्सवामध्ये  लहान मुलांसाठी विविध स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी हळदीकुंकू, पैठणीचा खेळ होममिनिस्टर तसेच जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.  महाड येथील सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. श्री. श्याम महाराज मिरगळ यांचे किर्तनही ठेवण्यात आले होते. संपूर्ण गावामध्ये पालखी फिरवण्यात आली. या पालखी सोहळ्यामध्ये संपूर्ण गावातील लहान-थोर, महिला-पुरुष एक पोशाख-एक रंगामध्ये मोठया उत्साहाने सामील झाले होते. आणि प्रथमच या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण युट्युब लाईवच्या माध्यमातून करण्यात आले होते. जेणेकरून ज्यां भाविकांना इच्छा असताना पोहचता आले नाही त्यांनी सुद्धा त्याचा आनंद आणि पालखी मिरवणूक पहावी हा त्यामागील उद्देश होता , आणि तो सत्कारणी लागला. शिवगर्जना मित्र ...
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
  निवडणूक तयारीचा निरीक्षकांकडून आढावा सतर्क राहून काटेकोर कार्यवाही करावी - सामान्य निरीक्षक रामप्रतापसिंग जाडोन अकोला : प्रतिनिधी :- मतदानाची तारीख चार दिवसांवर आली असून, सर्व यंत्रणांनी सतर्क राहून निवडणूक आयोगाच्या प्रत्येक निर्देशाचे व नियमाचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश सामान्य निवडणूक निरीक्षक रामप्रतापसिंग जाडोन यांनी आज येथे दिले.   लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 06- अकोला लोकसभा मतदारसंघासाठी प्रशासनाने केलेल्या तयारीचा, तसेच उमेदवारांच्या खर्चाचा आढावा आज निवडणूक निरीक्षकांनी नियोजनभवनात बैठकीद्वारे घेतला. पोलीस ऑब्झर्वर पी.आर. वेनमत्ती,  खर्च निरीक्षक बी जोतीकिरण यांच्यासह जिल्हाधिकारी अजित कुंभार, स्वीप नोडल अधिकारी बी. वैष्णवी, उपवनसंरक्षक कुमार स्वामी, आचारसंहिता कक्ष नोडल अधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणूकीच्या मतदानाला चार दिवस राहिले आहेत. त्यानुषंगाने यंत्रणांनी काटेकोर कार्यवाही करण्याचे निर्देश श्री. जाडोन यांनी दिले. यावेळी निवडणूक प...
Image
  मतदार चिठ्ठ्यांचे 100 टक्के वाटप करा - निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांचे निर्देश   अकोला : प्रतिनिधी : - मतदार चिठ्ठ्यांचे (वोटर इन्फर्मेशन स्लीप) घरोघर वाटप करण्यात येत आहे. त्यातून कुणीही मतदार सुटता कामा नये, याची मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांनी (बीएलओ) दक्षता घ्यावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.   लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत 06- अकोला लोकसभा मतदारसंघासाठी मतदान दि. 26 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. त्याअनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी श्री. कुंभार यांनी आज मतदान केंद्रांची पाहणी करून तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला व मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना आवश्यक कार्यवाहीबाबत निर्देश दिले.   श्री. कुंभार यांनी कमलानगर येथील आनंद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. मतदार चिठ्ठ्यांचे वाटप प्रत्येक घरी पोहोचून काटेकोरपणे करावे. हे शंभर टक्के पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यातून एकही घर सुटता कामा नये, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिका-यांनी दिले. मतदारसंघात मतदार चिट्ठीवा...
Image
  नवीन शेवा उरण येथे सुमारे १०० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान. उरण (विठ्ठल ममताबादे) :-  रक्तदान शिबिरांची श्रृंखला कायम ठेवत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवार दि. २१ एप्रिल २०२४ रोजी नवीन शेवा , उरण येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिरात सुमारे १०० निरंकारी भक्तांनी मानवीयतेच्या भावनेतून मोठ्या उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. संत निरंकारी रक्तपेढी, विले पार्ले मार्फत रक्त संकलन करण्यात आले. निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य शिकवणूकीमुळे निरंकारी भक्तगणांमध्ये मानव सेवेची भावना दृढमूल झालेली असून ते रक्तदाना व्यतिरिक्त इतर अनेक सामाजिक सेवांमध्ये निरंतर आपले योगदान देत आहेत. या शिबिरात देखील सुमारे १५० भक्तांनी रक्तदानासाठी आपली नावे नोंदवली होती यावरुन सद्गुरु माताजींच्या शिकवणूकीचा प्रभाव दिसून येतो. संत निरंकारी मंडळाचे क्षेत्रीय संचालक  अशोक केरेकरजी यांच्या शुभहस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक दत्ताराम पाटीलजी तसेच सेक्टर मधील सर्व ब्राँच चे मुखी, सेवादल, सं...
  मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रीया कलम 144 लागू  - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे परभणी : प्रतिनिधी :- भारत निवडणूक आयोगाने दि. 16 मार्च, 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असुन, कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आल्याने, जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी मतदानाच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत. मतदान केंद्राच्या ठिकाणापासुन 200 मिटर परिसरातील सर्व पक्ष कार्यालय/ उमेदवारांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपक, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरीक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे उमेदवाराचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूक कामाव्यतिरीक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्...
Image
32 रायगड लोकसभा मतदारसंघासाठी १३ उमेदवार निवडणूक रिंगणात  ८ जणांनी  घेतली माघार जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे मतदार संघात एकूण 16 लक्ष 68 हजार 372 मतदार बजावणार मतदानाचा हक्क रायगड : प्रतिनिधी :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यासाठी  ३२-रायगड लोकसभा मतदारसंघात आजच्या नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.  निवडणूक निर्णय अधिकारी यांचे समक्ष स्वतः उपस्थित राहून एकूण २१ वैध उमेदवारांपैकी ८ जणांनी  माघर घेतली आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहामध्ये निवडणूक प्रक्रिये बाबत माहिती देताना पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी श्री. जावळे बोलत होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते. रायगड लोकसभा मतदारसंघात १३ उमेदवारांमध्ये निवडणुकीची लढत होणार असून उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे 1)...
  उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर -जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी सातारा : प्रतिनिधी :- सातारा लोकसभा मतदार संघातील उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे जिल्हा खर्च नियंत्रण समितीकडे निवडणुक खर्चाची नोंदवही विहित वेळेत तपासून घ्यावेत, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहे.   45- सातारा लोकसभा मतदार संघातील उमेदवाराने प्रचार मोहिमेच्या कालावधीमध्ये किमान तीन वेळा तपासणीसाठी जिल्हा खर्च नियंत्रण समिती, सातारा सादर करण्यासाठी एक तर व्यक्तीश: किंवा आपल्या निवडणूक प्रतिनिधीमार्फत किंवा त्यांने यथोचीतरित्या केलेल्या प्राधिकृत केलेल्या व्यक्तीमार्फत खर्चाची नोंदवही सादर करणे आवश्यक आहे.  उमेदवारांच्या लेख्यांची तपासणी करण्यासाठी पुढीलप्रमाणे वेळापत्रक निश्चीत करण्यात आले आहे. खर्च नोंदवहीची प्रथम तपासणी 26 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 5 यावेळेत होईल, द्वितीय तपासणी 30 एप्रिल रोजी 10 ते 5 तर तृतीय तपासणी ही 4 मे रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत  जिल्हा नियंत्रण खर्च समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सात...
Image
नामनिर्देशन पत्र सादर करतेवेळी वेळेचे पालन करणे आवश्यक     : जिल्हाधिकारी जलज शर्मा - राजकीय पदाधिकारी, प्रतिनिधी यांच्या समवेत घेतली बैठक - नामनिर्देशन पत्र भरणेकामी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची दिली माहिती नाशिक : प्रतिनिधी :- लोकसभा निवडणूक २०२४ साठी येत्या २६ एप्रिल पासून नामनिर्देशनपत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी आज राजकीय पदाधिकारी, प्रतिनिधी यांची बैठक घेऊन नामनिर्देशन पत्र भरणेकामी मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची सविस्तर माहिती दिली.  भारत निवडणूक आयोगाने घोषित केल्यानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्यात दि. 26 एप्रिल ते 3 मे 2024 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करता येणार असून त्यासाठी संबंधित उमेदवारांनी वेळेचे पालन करणे आवश्यक आहे, अशा सूचना त्यानी यावेळी दिल्या.  जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, निवडणूक शाखेचे तहसिलदार शाम वाडकर, ...
Image
 'कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद संपन्न' उरण : विठ्ठल ममताबादे :- कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील वाणिज्य विभाग, अकाउंटिंग अँड फायनान्स विभाग व अर्थशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने "रोल ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड मॅनेजमेंट इन असेलरेटिंग क्रिएटिव्ह इकॉनोमी'' ( वाणिज्य, उद्योग व व्यवस्थापनातील अर्थव्यवस्था निर्माण गतीची भूमिका) या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या परिषदेसाठी देशातल्या विविध राज्यातून अनेक संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक यांनी सहभाग नोंदवला. परिषदेचे प्रास्ताविक परिषदेचे संयोजक प्रा. व्हि. एस. इंदुलकर यांनी केले. स्वागतपर भाषण महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए.शामा यांनी केले. परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून डॉ. सुरेश मैंद (अर्थशास्त्र विभाग प्रमुख तथा अध्यक्ष, अर्थशास्त्र अभ्यास मंडळ , मुंबई विद्यापीठ) हे होते. तर बीजभाषक म्हणून डॉ. एच. के.सिंग ,(विभाग प्रमुख, कॉमर्स विभाग, वाराणसी, उत्तर प्रदेश)हे होते. त्यांनी विविध उदाहरणांच्या साह्याने देशाच्या आर्थिक धोरणाचे विश्लेषण केले. उद्घाटन क...
Image
  सूक्ष्म निरिक्षकांनी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपले काम पार पाडावे -जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे परभणी : प्रतिनिधी : - लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवणारे निवडणूक सुक्ष्म निरीक्षक (मायक्रो ऑर्ब्जव्हर्स) निवडणूक आयोगाचे कान-डोळे असून, या निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपले काम चोख पार पाडावे अशा सूचना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिल्या.  जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज (दि.18) संपन्न झालेल्या सुक्ष्म निरीक्षकांच्याबैठकीत मार्गदर्शन करताना श्री. गावडे बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, सुनिल हट्टेकर यांची उपस्थिती होती.  यावेळी श्री. गावडे म्हणाले की, मतदान केंद्रावर सकाळी मॉक पोलींग (अभिरुप मतदान) मतदान प्रक्रिये पासून ते सायंकाळी मतदान संपेपर्यत घडणाऱ्या सर्व घटनांचे अवलोकन करुन त्या माहितीचा अहवाल निवडणूक सुक्ष्म निरीक्षकांच्या मार्फत निवडणूक आयोगाकडे सादर केला जातो. मतदानासाठी इव्हीएम यंत्र तयार करणे, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अभिरुप मतदानाची पद्धत...
Image
  जिल्हाधिकारी यांनी घेतला जिंतूर विधानसभा मतदार संघाचा आढावा परभणी : प्रतिनिधी : -  परभणी लोकसभा मतदार संघाकरीता 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज जिंतूर विधानसभा मतदार संघास प्रत्यक्ष भेट निवडणूक विषयक कामांच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.  यावेळी श्री. गावडे यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिंतूर  येथील स्टाँगरूमला भेट देवून निवडणूकीसाठी मतपत्रिकेसह मतदान यंत्राचे सिंलीगचे काम चालू असतांना प्रत्यक्ष भेट देवून निवडणुक विषयक कामकाजा सविस्तर आढावा घेतला. तसेच मतदान यंत्रे ठेवण्यासाठीची व्यवस्था, सि.सि.टी.व्ही. यंत्रणा, अग्निशमन व्यवस्था यांची सुक्ष्मरित्या चाचणी करुन घ्यावी. याठिकाणी 24x7 आवश्यक पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करावी. निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात. कायदा व सुव्यवस्था व पोलीस बंदोबस्त आराखडा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात यावा. मतदान जनजागृती, अधिकारी-कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबतही निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन ...
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलीस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा  साताऱ्यात दाखल  सातारा : प्रतिनिधी :-  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम सातारा जिल्हयामध्ये जाहीर झाला असून दिनांक 16 मार्चपासून आचारसंहिता जाहीर करण्यात आलेली आहे.  निवडणुक  प्रक्रियेच्या अनुषंगाने निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन (I.A.S.) व पोलीस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा (I.P.S.) यांची भारत निवडणुक आयोगामार्फत नियुक्ती करणेत आलेली असून ते  18 एप्रिल रोजी सातारा जिल्ह्यात आगमन झालेले आहेत.  लोकसभा निवडणुक प्रक्रियेच्या अनुषंगाने निवडणुकीच्या बाबतीत नागरिकांच्या काही शंका असल्यास किंवा माहिती हवी असल्यास अथवा काही तक्रार असल्यास नागरिकांनी दूरध्वनी क्रमांक 02162-299550 या नंबरवर संपर्क करावा. तसेच निवडणूक प्रक्रियेसंबधी काही शंका व तक्रारी असतील व त्याकामी निरिक्षक यांची समक्ष भेट हवी असल्यास भेटीच्या पूर्व परवानगीसाठी नोडल अधिकारी  सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव यांचे भ्रमणध्वनी क्र. 9764518275 यावर संपर्क साधून   निवडणूक निरिक्षक ...
Image
  जिल्हाधिका-यांनी केली गृह मतदान प्रक्रियेची पाहणी अकोला : प्रतिनिधी :-  गृह मतदानाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा दिली आहे. त्यासाठी विकल्प दिलेल्या मतदारांनी निश्चित तारखांना घरी बसून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज दिले. जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी आज मूर्तिजापूर तालुक्यातील सांगवी येथे भेट देऊन गृह मतदान प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली. तेथील दिव्यांग मतदार गोवर्धन जानराव खांडेकर यांनी आज घरी बसून आपला मतदानाचा हक्क बजावला. अकोला लोकसभा मतदार संघातील 726 दिव्यांग व 85 वर्षापुढील 1 हजार 632 मतदार अशा एकूण 2 हजार 358 मतदारांना गृह मतदानाची सुविधा देण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत 1 हजार 304 मतदारांनी घरबसल्या मतदानाचा हक्क बजावला.     गृह मतदानासाठी प्राप्त विकल्पानुसार मतदार निश्चित करण्यात आले असून स्वतंत्र मतदान पथ के नियुक्त करण्यात आली आहे. ही मतदान पथके मतदाराच्या घरी पोहोचून त्यांना मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. या सुविधेमुळे दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांमध...
Image
  निवडणूक निरीक्षक पोलीस मतदार संघात दाखल रायगड : प्रतिनिधी :- भारत निवडणूक आयोगाने  32 रायगड लोकसभा मतदारसंघाच्या  सार्वत्रिक निवडणुकीसाठी  निवडणूक निरीक्षक (पोलीस)  म्हणून  श्रीमती जोयस लालरेम्मवी यांची नियुक्ती केली आहे. श्रीमती लालरेम्मवी जिल्ह्यात दाखल झाल्या असून जिल्हाधिकारी तथा  निवडणूक निर्णय अधिकारी श्री किशन जावळे यांनी त्यांचे स्वागत केले.
Image
 97-गंगाखेड मतदार संघातील 85 वर्षांपेक्षा जास्त  आणि दिव्यांग मतदारांच्या गृह मतदानास सुरुवात : सहायक निवडणुक निर्णय अधिकारी जीवराज डापकर परभणी : प्रतिनिधी :-    17-परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीकरिता मतदार संघातील निवडणूक यंत्रणा 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांची घरोघरी जावून मतदान नोंदविण्याची प्रक्रिया गंगाखेड विधानसभा मतदार संघात सुरुवात झाली आहे. भारत निवडणूक विभागाने सुरु केलेल्या या सुविधेमुळे वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाच्या या प्रक्रियेबाबत आनंद व्यक्त केला आहे. 97-गंगाखेड मतदार संघातील 85 वर्षांपेक्षा जास्त आणि दिव्यांग मतदारांच्या गृह मतदानास सुरुवात झाल्याची माहिती 97-गंगाखेड विधानसभा संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी दिली आहे. देशातील एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. या पार्श्वभूमीवर 17-परभणी लोकसभा मतदार ...
  हवामान विभागाचा उष्णतेच्या लाटांचा इशारा मतदान केंद्रावर पुरेशा सुविधा ठेवाव्यात - जिल्हाधिकारी अजित कुंभार   अकोला : प्रतिनिधी :-  एप्रिल ते जूनदरम्यान उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवणा-या संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा ठेवाव्यात, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.  मतदार, विशेषत: ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, तसेच निवडणूक कर्मचा-यांची सुरक्षा सुनिश्चित करणे आवश्यक आहे. भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फेही याबाबत आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार केंद्रांवर आवश्यक सुविधा व मार्गदर्शक तत्वांचे पालन होण्याची खातरजमा करावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिका-यांनी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदारांना दिले आहेत.  निवडणूक कालावधीत उष्मा लाटांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मतदान केंद्रावर पंखा, कुलर, तापमान नियंत्रणासाठी आवश्यक साधने, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी विशेष सहाय्य, पेयजल, आरो्ग्य पथक आदी सुविधा असाव्यात. निवडणूक कर्मचा-यांना उष्णतेबाबत घ्यावयाची दक...
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
  अलिबाग येथे मतदार जनजागृती साठी"उत्सव लोकशाहीचा बाईक रॅलीला" उत्स्फूर्त प्रतिसाद  अलिबाग : प्रतिनिधी :-  सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ निमित्ताने जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने आयोजित "उत्सव लोकशाहीचा बाईक रॅली"  साठी मतदार, युवक, महिला अधिकारी -कर्मचाऱ्यांसह उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्यासह जिल्हा पोलिस अधिकारी सोमनाथ घार्गे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथून हिरवा झेंडा दाखवून  सुरुवात झाली. याप्रसंगी मतदान जागृतीबाबत पथनाट्याचे आयोजन अलिबाग नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून आज सकाळी आठ वाजता सुरु झालेली रॅली अलिबाग शहरातील विविध भागातून नेण्यात आली. यावेळी नवमतदार, युवक व नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृतीसाठी आवाहन करण्यात आले.  बाईक रॅलीसाठी  जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. घार्गे यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, प्रांताधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, तहसीलदार विक...
Image
रोह्यात दोन मुलींचा विनयभंग  तरुणा विरोधात गुन्हा दाखल               रोहा : प्रतिनिधी :- बाजारात सामान खरेदीसाठी गेलेली २० वर्षीय तरुणी आणि शाळेत जाणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या एका २३ वर्षीय परप्रांतीय तरुणाला संतप्त जमावाने चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                                 मुशरफ अशरफ अन्सारी ( रा. रॉयल रेसिडेन्सी बोरी गल्ली रोहा बाजार पेठ ) असे आरोपी तरुणाचे नाव असून दि. ११ मार्च २०२४ रोजी सकाळी ११: ४५ वा. च्या सुमारास १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना तिचा पाठलाग करून तीला वारंवार अश्लील टोमणे मारून तीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या घटनेची माहिती समजताच संतप्त जमावाने तरुणाला चांगलाच चोप दिला.     त्याच तरुणाने शुक्रवारी (दि. ५) रात्री ८:१५ वा. च्या सुमारास शहरातील एक २० वर्षीय तरुणी खरेदीसाठी आडवी बा...
Image
 17-परभणी लोकसभा मतदार संघाच्या संदर्भीकाचे प्रकाशन परभणी : प्रतिनिधी : - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती कार्यालय, परभणी यांच्यामार्फत तयार करण्यात आलेल्या 17-परभणी लोकसभा मतदार संघ निवडणूक-2024 संदर्भीकाचे निवडणूक निरीक्षक (सामान्य) कृष्णकुमार निराला आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले. जिल्हा माहिती कार्यालय यांच्यामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या 17-परभणी लोकसभा मतदार संघ निवडणूक-2024 संदर्भिकेमध्ये निवडणूक आचारसंहिता, पेड न्यूजचे निकष, सोशल मिडिया, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, महाराष्ट्र राज्य निवडणूक कार्यक्रम, 17-परभणी लोकसभा मतदार संघ निवडणूक कार्यक्रम, निवडणूक निरिक्षक, भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, 17-परभणी लोकसभा मतदार संघातील प्रमुख संपर्क अधिकारी, कक्ष प्रमुख, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक तसेच मतदार संख्या, मतदान केंद्र, ईव्हीएम/व्हिव्हिपॅट आणि सन 1951 ते सन 2019 पर्यंत परभणी लोकसभा मतदार संघात पार पडलेल्या निवडणूकांची सविस्तर माहिती संकलीत करण्यात...
  मोशी येथील गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृहासाठी खासगी इमारत भाड्याने देण्याचे आवाहन पुणे : प्रतिनिधी : मोशी येथील गुणवंत मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी पिंपरी चिंचवड शहरात खासगी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वसतिगृहाची कमाल १०० विद्यार्थ्यांची क्षमता आहे. या इमारतीत सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. इच्छुकांनी अधीक्षक गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह, स्पाईन रोड, मोशी, पिंपरी-चिंचवड यांच्या कार्यालयात संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी अधीक्षक नरेश मकवाना भ्रमणध्वनी क्रमांक ९३२५०५४३५८ किंवा ई-मेल ॲड्रेस govtboyshostelpcmp@gmal.com वर संपर्क साधण्याचे आवाहन गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.
Image
  देशात पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे मूळ संकल्पना पुण्याची; पुणे शहरातील ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये  मतदान केंद्रे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे पुणे : प्रतिनिधी : - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी कमी मतदान असलेल्या शहरांमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांत मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून असा उपक्रम देशात प्रथमच राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची मूळ संकल्पना पुणे जिल्ह्याची असून पुणे शहरातील ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले. जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदार संघांच्या निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार बारामती लोकसभा मतदार संघाची अधिसूचना १२ एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार आहे तर नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १९ एप्रिल २०२४ अशी आहे. बारामती मतदार संघात नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत २२ एप्रिल आहे. पुणे, शिरुर आणि मावळ मतदार संघांची अधिसूचना प्रसिद्धी १८ एप्रिल र...
  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य सर्वांनी पार पाडावे : आशिमा मित्तल स्वीप अंतर्गत जिल्ह्यात मतदान जागृतीचे विविध कार्यक्रम संपन्न नाशिक : प्रतिनिधी :- मतदान करणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी असून हे राष्ट्रीय कर्तव्य सर्वांनी पार पाडावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप (SVEEP) च्या मुख्य नोडल अधिकारी आशिमा मित्तल यांनी आज केले.  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमिवर निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात स्वीप अंतर्गत शहरी व ग्रामीण भागात विविध कार्यक्रमांचे व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने शहरातील होरायझन अकॅडमीमध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.  यावेळी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, वर्षा फडोल यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी तथा होरायझन अकादमीचे शिक्षकवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करून लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी व्हावे, य...
Image
  पनवेल येथील मतदान यंत्र वितरण केंद्राला जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट रायगड : प्रतिनिधी :-  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्राचे आज पनवेल येथील वखार महामंडळ गोदामातील मतदान यंत्र वितरण केंद्रातून राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत वितरण सुरू झाले. जिल्हाधिकारी श्री.किशन जावळे यांनी वितरण केंद्राला भेट देवून प्रक्रियेची पाहणी केली. रायगड जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांसाठी मतदान यंत्र वितरण होणार आहे. यावेळी रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड आणि निवडणूक यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मतदान यंत्र वितरण प्रक्रिया पारदर्शकपणे करावी. वितरणाचे कामकाज अचूक करावे, यंत्राची वाहतूक करताना सुरक्षाविषयक नियमांचे तंतोतंत पालन करावे.   ईव्हीएम यंत्राची वाहतूक करताना निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे पालन व्हावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी यावेळी दिले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील यंत्र स्वीकारण्यासाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र योग्य ठिकाणी जावे म्हणून मतदारसंघनिहाय विभागणी करण्यात आली आहे. ...
Image
वरंध घाट 30 मे पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना रायगड :  प्रतिनिधी : - रायगड जिल्हा हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 वरील मौजे वरंध ते  रायगड जिल्हा हद्दीत प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने  रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम, संरक्षण भिंत बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे दि.8 एप्रिल पासून ते 30 मे 2024 पर्यंत वरंध घाटातील रस्ता सर्व प्रकारच्या अवजड व लहान मोठ्या वाहनांसा महामार्ग वाहतूकीसाठी बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग 965डीडी किमी 88/100 (राजेवाडी) ते किमी 96/700 (रायगड जिल्हा हद्द) या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम संरक्षण भिंती बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्यासाठीची कामे प्रगतीत आहे.  वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये संरक्षक भिंतीचे काम प्रगतीत असून बहूतांश काम पूर्ण झालेले आहे,. परंतू साखळी क्रमांक 88/100 (मौजे वरंघ) ते 96/700 (रायगड जिल्हा हद्द) या लांबीमध्ये काम सुरु करावयाचे आहे. सदरच्या लांबीमध्ये खोल दरी ...
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image