17-परभणी लोकसभा मतदार संघाच्या संदर्भीकाचे प्रकाशन
परभणी : प्रतिनिधी : - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती कार्यालय, परभणी यांच्यामार्फत तयार करण्यात आलेल्या 17-परभणी लोकसभा मतदार संघ निवडणूक-2024 संदर्भीकाचे निवडणूक निरीक्षक (सामान्य) कृष्णकुमार निराला आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले.
जिल्हा माहिती कार्यालय यांच्यामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या 17-परभणी लोकसभा मतदार संघ निवडणूक-2024 संदर्भिकेमध्ये निवडणूक आचारसंहिता, पेड न्यूजचे निकष, सोशल मिडिया, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, महाराष्ट्र राज्य निवडणूक कार्यक्रम, 17-परभणी लोकसभा मतदार संघ निवडणूक कार्यक्रम, निवडणूक निरिक्षक, भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, 17-परभणी लोकसभा मतदार संघातील प्रमुख संपर्क अधिकारी, कक्ष प्रमुख, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक तसेच मतदार संख्या, मतदान केंद्र, ईव्हीएम/व्हिव्हिपॅट आणि सन 1951 ते सन 2019 पर्यंत परभणी लोकसभा मतदार संघात पार पडलेल्या निवडणूकांची सविस्तर माहिती संकलीत करण्यात आलेली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित संदर्भिका प्रकाशनाप्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणविरकर, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, तहसिलदार पांडुरंग माचेवाड, नायब तहशिलदार प्रशांत वाकोडकर, सतीश रेड्डी, स्वीय सहायक कैलास मठपती, दत्ता गिणगिने यांची उपस्थिती होती.
ही संदर्भिकेसाठी गजानन शिंदे, शिवाजी गमे, प्रा. वामनकुमार वाणी, गोविंद बकान, दिवाकर जगताप यांनी माहिती संकलन आदीसाठी योगदान दिले.
Comments
Post a Comment