निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलीस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा साताऱ्यात दाखल
सातारा : प्रतिनिधी :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम सातारा जिल्हयामध्ये जाहीर झाला असून दिनांक 16 मार्चपासून आचारसंहिता जाहीर करण्यात आलेली आहे. निवडणुक प्रक्रियेच्या अनुषंगाने निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन (I.A.S.) व पोलीस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा (I.P.S.) यांची भारत निवडणुक आयोगामार्फत नियुक्ती करणेत आलेली असून ते 18 एप्रिल रोजी सातारा जिल्ह्यात आगमन झालेले आहेत.
लोकसभा निवडणुक प्रक्रियेच्या अनुषंगाने निवडणुकीच्या बाबतीत नागरिकांच्या काही शंका असल्यास किंवा माहिती हवी असल्यास अथवा काही तक्रार असल्यास नागरिकांनी दूरध्वनी क्रमांक 02162-299550 या नंबरवर संपर्क करावा. तसेच निवडणूक प्रक्रियेसंबधी काही शंका व तक्रारी असतील व त्याकामी निरिक्षक यांची समक्ष भेट हवी असल्यास भेटीच्या पूर्व परवानगीसाठी नोडल अधिकारी सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव यांचे भ्रमणध्वनी क्र. 9764518275 यावर संपर्क साधून निवडणूक निरिक्षक यांचे पूर्वपरवानगीनंतर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी 12 ते 3 या वेळेत शासकीय विश्रामगृह, सातारा येथे उपस्थित रहावे.
पोलीस निवडणूक निरिक्षक यांची समक्ष भेट हवी असल्यास भेटीच्या पूर्व परवानगीसाठी नोडल अधिकारी समाधान बिले API, सातारा यांचे भ्रमणध्वनी क्र.8805993740 यांचेशी संपर्क करुन भेटीची पूर्व परवानगी घेणेत यावी. पोलिस निवडणूक निरिक्षक यांचे पूर्वपरवानगीनंतर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी 12 ते 3 या वेळेत शिवतेज विश्रामगृह, तालुका पोलिस स्टेशन जवळ सातारा या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी सातारा जितेंद्र डुडी यांनी केले आहे. निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन यांचा भ्रमणध्वनी क्र. 9404713244 आहे. तसेच पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचा भ्रमणध्वनी क्र. 9405103245 असा आहे.
Comments
Post a Comment