जिल्हाधिकारी यांनी घेतला जिंतूर विधानसभा मतदार संघाचा आढावा

परभणी : प्रतिनिधी : -  परभणी लोकसभा मतदार संघाकरीता 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज जिंतूर विधानसभा मतदार संघास प्रत्यक्ष भेट निवडणूक विषयक कामांच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. 

यावेळी श्री. गावडे यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिंतूर  येथील स्टाँगरूमला भेट देवून निवडणूकीसाठी मतपत्रिकेसह मतदान यंत्राचे सिंलीगचे काम चालू असतांना प्रत्यक्ष भेट देवून निवडणुक विषयक कामकाजा सविस्तर आढावा घेतला. तसेच मतदान यंत्रे ठेवण्यासाठीची व्यवस्था, सि.सि.टी.व्ही. यंत्रणा, अग्निशमन व्यवस्था यांची सुक्ष्मरित्या चाचणी करुन घ्यावी. याठिकाणी 24x7 आवश्यक पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करावी. निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात. कायदा व सुव्यवस्था व पोलीस बंदोबस्त आराखडा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात यावा. मतदान जनजागृती, अधिकारी-कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबतही निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना श्री. गावडे यांनी यावेळी दिल्या. 

श्री. गावडे यांनी यावेळी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या विविध पथकांचा आढावा घेवून मार्गदर्शन केले. तसेच मतदार संघातील साहित्य स्विकृती व साहित्य वाटप केंद्रास भेट देवून तेथील व्यवस्थेची पाहणी केली.

यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती संगीता सानप, तहसीलदार राजेश सरवदे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog