32 रायगड लोकसभा मतदारसंघासाठी १३ उमेदवार निवडणूक रिंगणात

 ८ जणांनी  घेतली माघार

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे

मतदार संघात एकूण 16 लक्ष 68 हजार 372 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

रायगड : प्रतिनिधी :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यासाठी  ३२-रायगड लोकसभा मतदारसंघात आजच्या नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.  निवडणूक निर्णय अधिकारी यांचे समक्ष स्वतः उपस्थित राहून एकूण २१ वैध उमेदवारांपैकी ८ जणांनी  माघर घेतली आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहामध्ये निवडणूक प्रक्रिये बाबत माहिती देताना पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी श्री. जावळे बोलत होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते.

रायगड लोकसभा मतदारसंघात १३ उमेदवारांमध्ये निवडणुकीची लढत होणार असून उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे

1) श्री.अनंत पद्मा गिते (अपक्ष)( गळ्याची टाय),

2)श्री.अनंत बाळोजी गिते (अपक्ष)( चिमणी),

3) श्री.अनंत गंगाराम गिते, (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे) ( मशाल),

4) श्री.नितीन जगन्नाथ मयेकर, (अपक्ष) (पत्रपेटी),

5) श्री. मंगेश पद्माकर कोळी, (अपक्ष)( मनुष्य व शिडी युक्त नाव),

6) श्री.प्रकाश बाळकृष्ण चव्हाण, (भारतीय जवान किसान पार्टी)( भेट वस्तू))

7) श्री.पांडुरंग दामोदर चौले, (अपक्ष)( जहाज),

8) श्री.सुनिल दत्तात्रेय तटकरे, (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)(घड्याळ),

9) श्री. श्रीनिवास सत्यनारायण मट्टपरती, (अपक्ष)(हिरा),

10) श्री.अजय यशवंत उपाध्ये, (अपक्ष)( ऑटो रिक्षा),

11)श्रीमती अंजली अश्विन केळकर,(अपक्ष)( बेल्ट),

12) श्री.अमित श्रीपाल कवाडे,(अपक्ष) ( फुलकोबी),

13) श्रीमती कुमोदिनी रविंद्र चव्हाण, (वंचित बहुजन आघाडी)(प्रेशर कुकर)

माघार घेतलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

1)श्री.सुनिल दत्ताराम तटकरी,(अपक्ष)

2)श्री.आस्वाद जयदास पाटील, (Peasants and Workers Party of India)

3)श्री.अभिजित अजित कडवे, (अपक्ष)

4)श्री.नंदकुमार गोपाळ रघुवीर,(लोकराज्य पार्टी )

5)श्री.मिलिंद काशिनाथ कांबळे,(बहुजन समाज पार्टी आंबेडकर)

6)श्री.विजय गोपाळ बना,(अपक्ष)

7)श्री.गोपाळ यशवंतराव तंतरपाळे, (अपक्ष) 

8)श्री.अस्मिता एकनाथ उंदिरे,(अपक्ष)

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ३२  रायगड लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत लागू राहणार आहे.

Comments

Popular posts from this blog