उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर
-जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी
सातारा : प्रतिनिधी :- सातारा लोकसभा मतदार संघातील उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे जिल्हा खर्च नियंत्रण समितीकडे निवडणुक खर्चाची नोंदवही विहित वेळेत तपासून घ्यावेत, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहे.
45- सातारा लोकसभा मतदार संघातील उमेदवाराने प्रचार मोहिमेच्या कालावधीमध्ये किमान तीन वेळा तपासणीसाठी जिल्हा खर्च नियंत्रण समिती, सातारा सादर करण्यासाठी एक तर व्यक्तीश: किंवा आपल्या निवडणूक प्रतिनिधीमार्फत किंवा त्यांने यथोचीतरित्या केलेल्या प्राधिकृत केलेल्या व्यक्तीमार्फत खर्चाची नोंदवही सादर करणे आवश्यक आहे.
उमेदवारांच्या लेख्यांची तपासणी करण्यासाठी पुढीलप्रमाणे वेळापत्रक निश्चीत करण्यात आले आहे. खर्च नोंदवहीची प्रथम तपासणी 26 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 5 यावेळेत होईल, द्वितीय तपासणी 30 एप्रिल रोजी 10 ते 5 तर तृतीय तपासणी ही 4 मे रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत जिल्हा नियंत्रण खर्च समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे खर्चाची नोंदवह्या तपासण्यात येतील.
Comments
Post a Comment