शिवगर्जना मित्र मंडळातर्फे श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहने साजरा

तळा : नजीर पठाण :- रायगड जिल्ह्यामधील तळा तालुक्यातील वृंदावन(भानंग कोंड) या गावामध्ये शिवगर्जना मित्र मंडळ यांच्यातर्फे २२ एप्रिल व २३एप्रिल २०२४  रोजी आयोजित करण्यात आलेला हनुमान जयंती उत्सव- २०२४ मोठ्या उत्साहामध्ये व जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला.या उत्सवामध्ये  लहान मुलांसाठी विविध स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी हळदीकुंकू, पैठणीचा खेळ होममिनिस्टर तसेच जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. 

महाड येथील सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. श्री. श्याम महाराज मिरगळ यांचे किर्तनही ठेवण्यात आले होते. संपूर्ण गावामध्ये पालखी फिरवण्यात आली. या पालखी सोहळ्यामध्ये संपूर्ण गावातील लहान-थोर, महिला-पुरुष एक पोशाख-एक रंगामध्ये मोठया उत्साहाने सामील झाले होते. आणि प्रथमच या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण युट्युब लाईवच्या माध्यमातून करण्यात आले होते. जेणेकरून ज्यां भाविकांना इच्छा असताना पोहचता आले नाही त्यांनी सुद्धा त्याचा आनंद आणि पालखी मिरवणूक पहावी हा त्यामागील उद्देश होता , आणि तो सत्कारणी लागला. शिवगर्जना मित्र मंडळ वर्षभर विविध शैक्षणिक, सामाजिक, कला-क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात आयोजित करत असतात.

Comments

Popular posts from this blog