रोह्यात दोन मुलींचा विनयभंग तरुणा विरोधात गुन्हा दाखल
रोहा : प्रतिनिधी :- बाजारात सामान खरेदीसाठी गेलेली २० वर्षीय तरुणी आणि शाळेत जाणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या एका २३ वर्षीय परप्रांतीय तरुणाला संतप्त जमावाने चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुशरफ अशरफ अन्सारी ( रा. रॉयल रेसिडेन्सी बोरी गल्ली रोहा बाजार पेठ ) असे आरोपी तरुणाचे नाव असून दि. ११ मार्च २०२४ रोजी सकाळी ११: ४५ वा. च्या सुमारास १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना तिचा पाठलाग करून तीला वारंवार अश्लील टोमणे मारून तीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या घटनेची माहिती समजताच संतप्त जमावाने तरुणाला चांगलाच चोप दिला.
त्याच तरुणाने शुक्रवारी (दि. ५) रात्री ८:१५ वा. च्या सुमारास शहरातील एक २० वर्षीय तरुणी खरेदीसाठी आडवी बाजार पेठ येथे गेली असता सदर पीडित तरुणीच्या अवती भोवती फिरून घरा पर्यंत पाठलाग केला, तसेच दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि. ६) दुपारी २ वा. च्या सुमारास सदर तरुणीच्या मोबाईलचे इंस्टाग्राम अकाउंटवरील फोटो साहिल अन्सारी या नावाने पोस्ट करुन 'चेक इट आउट न्यू पोस्ट' अशी स्टोरी ठेवली, तसेच फॉलोबॅक मिलेंगा क्या? असा मेसेज करून पाठलाग करून शरीर सुखाची मागणी केल्याची घटना घडली. या घटनेचे वृत्त शहरात वाऱ्या सारखे पसरले. सदर परप्रांतीय तरुणामुळे शहरातील शांततेला वारंवार बाधा निर्माण होतं असल्याने संतप्त जमावाने पुन्हा एकदा दुकानात जाऊन त्याला बेदम मारहाण केली व आरोपी तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन केले. या दोन्ही घटनानंतर आरोपी मुशरफ अन्सारी विरोधात रोहा पोलीस ठाण्यात विनयभंग व बालकांचे लैगिक अपराधांपासून संरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस करीत आहेत.
Comments
Post a Comment