मुंबई-गोवा हायवेवरील वाहतूक कोंडीचा तिडा सुटता सुटेना, प्रवाश्यांचा खोलंबा प्रचंड उकाड्याचा करावा लागत आहे सामना 

कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण):- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड  इंदापूर व माणगाव दरम्यानच्या चौपदरी करणाचे काम  अदयाप ही अर्धवट स्थितीत असल्यामुळे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असुन यामुळे वाहतूक कोंडी ही निर्माण होत असुन यामुळे प्रवाश्यांचा खोलंबा होतांना दिसत असुन यामुळे वाहने तासंतास उभी करावी लागत असल्यामुळे प्रवाश्यांना प्रचंड उखाड्याचा सामना करावा लागत आहे.

 शनिवार व रविवार नोकरदारांना असणाऱ्या सुट्टया व शालेय विद्यार्थ्यांना शाळेला पडलेल्या सुट्ट्या, तlसेच सुरु झालेली लग्न सराई यामुळे मुंबई-गोवा हायवे वर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. परंतु कोलाड, इंदापूर व माणगाव मधील रस्त्याचे काम पंधरा वर्षांपासून अर्धवट स्थितीत असुन अद्यापही या कामात प्रगती नाही या दोन्ही बाजारपेठेतील रस्ता अरुंद असल्यामुळे दररोज वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

 सर्व लोकनेते मात्र आपापल्या खुर्ची साठी प्रचारात गुंतले आहेत परंतु अशा महत्वाच्या कामात कोणाचे ही लक्ष नाही.किती ठेकेदार आले किती गेले?रस्त्याचे काम काय मार्गी लागत नाही. महामार्ग पूर्ण होण्यासाठी लोकनेत्याकडून फक्त तारीख पे तारीख परंतु महामार्गाच्या कामात कोणतेही प्रगती नाही.यामध्ये ठेकेदारावर  प्रशासनाचा नसलेल्या वचक यामुळे फक्त मनमानी सुरु आहे.रोज मरे त्याला कोण रडे! अशीच परिस्थिती असून यामुळे नाहक बळी जात आहे व अनेकांचे संसार उद्योस्त होतांना दिसत आहे.याला जबाबदार कोण? असा प्रश्न प्रवाशी वर्गातून केला जात आहे

Comments

Popular posts from this blog