दारू पियुन रेल्वे पुलावरून तोल गेल्याने तरुणाचा मृत्यू
कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण) मुंबई-गोवा हायवेवरील कोलाड कोकण रेल्वे ब्रिज वरुन दारू पियुन तोल गेल्याने ब्रिजच्या खाली पडून तरुणाचा दुर्दैवी अंत झाला असल्याची घटना घडली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार शनिवार दि.२७/४/२०२४ रोजी २.५३ वा संत रोहिदास नगर कोलाड येथील अभिषेक रविंद्र जानवरकर वय वर्षे ३० यांनी कोकण रेल्वे ब्रिजवर दारू पियाला असता त्याचा दारूच्या नशेत तोल जाऊन तो खाली पडून ब्रिजच्या खाली असलेल्या खडी व दगडावर आपटून त्याच्या कपाळाला व नाकातोंडा वाटे रक्त येऊन गंभीर स्वरूपाची दुखापत होऊन मयत झाला असुन याचा अधिक तपास कोलाड पोलीस ठाण्याचे पोहवा एस जे मोरे हे करीत आहेत
Comments
Post a Comment