सासवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रियेस सुरुवात
पुणे : प्रतिनिधी :- सासवड ता. पुरंदर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
वसतिगृहात इयत्ता ७ वी नंतर शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अभियंता पदवी व पदव्युत्तर महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशासाठी प्रवेश अर्ज वसतिगृहात उपलब्ध आहेत.
वसतिगृह प्रवेश हा प्रवर्गनिहाय गुणवत्तेवर राहील. वसतिगृहात विनामूल्य निवास, अंथरूण, पांघरुण, भोजन, पुस्तके, स्टेशनरी, शैक्षणिक बाबींकरीता आर्थिक सहाय्य, दरमहा निर्वाह भत्ता आदी सुविधा पुरविण्यात येतात.
इच्छुक विद्यार्थ्यांनी वसतिगृहात येवून नोंद करून प्रवेशासाठीचे अर्ज घेण्याचे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.
Comments
Post a Comment