सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून ध्वजदिन निधीमध्ये योगदान द्यावे- महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले पुणे : प्रतिनिधी :- मातृभूमीची सेवा बजावतांना वीरमरण आलेल्या, जखमी झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याकरीता प्रशासनासोबतच नागरिकांनी सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून ध्वजदिन निधीमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन -२०२४ निधी संकलन शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल दिपक ठोंगे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल सतेश हंगे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. महानगरपालिका आयुक्त डॉ. भोसले म्हणाले, सैनिक अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जीवाची पर्वा न करता देशाची सेवा करतात. पुणे जिल्हा प्रशासनाने ध्वजदिन निधी संकलनात कर्तव्य समजून आपले योगदान देवून त्यां...
Comments
Post a Comment