रासायनिक केमिकळयुक्त पाणी कालव्यात सोडणारे टँकर स्थानिक नागरिकांनी पकडले, सर्वत्र एकच खळबळ, कारवाहीची मागणी.
कोलाड (विश्वास निकम):- मुंबई गोवा महामार्गालगत खांब येथील कालव्यात रासायनिक केमिकल मिश्रित पाणी सोडणारे टँकर स्थानिक नागरिकांनी पकडले असून यांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याची घटना आज गरुवारी ६ जून रोजी सकाळी घडली असल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली असून यांच्यावर प्रशासनाने कडक कारवाही करावी अशी जोरदार मागणी येथील स्थानिक ग्रामस्थ नागरिकांनी केली आहे.
डोळवहाल बंधारे कूंडलिका सिंचनातून बारमाही वाहणारा कोलाड पाटबंधारेचा आंबा खोऱ्याचा उजवा तिर कळवा हा आय पी सी एल,आर सी एफ अशा मोठ्या कारखान्यांना पाणी पुरविणारा कळवा प्रकल्प असून या संधीचा फायदा घेत काही रासायनिक केमिकल मिश्रित टँकरवाले हे रासायनिक सांड पणी मिश्रित केमिकल या कालव्यात सोडतात त्यामुळे या दूषित पाण्यामुळे मासेमारी तसेच अनेकांना होणारे आजार सुरू होते त्यामुळे परिसरातील ऐनघर, हेदवली,सुकेळी, नागरिकांनी अनेकदा जलसंपदा कोलाड विभाग पाठ बंधारे कडे तक्रार देखील आहे मात्र येथील वाचमन ची तसेच नागरिकांची सतर्कता त्यामुळे खुले आम बारमाही वाहणाऱ्या कालव्यात रसायन केमिकल मिश्रित सांड पाणी सोडताना टँकरवर पारथ ठेऊन तो पकडण्यात आला असून टँकर सह रसायन विक्री करणाऱ्या मालकवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी संबधीत ग्रामस्थांनी कोलाड पोलिस ठाण्यात केली आहे.
सदरच्या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिसांनी घटनास्थळी भेट देत या घटनेची पाहणी करत याचा अधिक तपास सुरू केला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा ऐनघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनोहर सुटे, ऐनघर बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश कातकरी, उपाध्यक्ष सतिश सुटे, मंगेश लाड,मनोज खांडेकर, सचिन भोसले, प्रकाश डोबळे, संदेश गायकर,राजु कोकळे याच्या सहित ऐनघर पंचक्रोशीत असंख्य नागरिक उपस्थित होते.
प्रतिक्रिया
रसायन केमिकल मालवाहू टँकर क्रमांक एम एच ४६ एफ ६१९९ हा टँकर दूषित केमिकल पाणी कालव्यात सोडताना नागरिकांच्या सतर्कतेमुळे गुरूवारी ६ जून रोजी मिळाला.या दुषित पाण्यामुळे अनेकदा मासे मरून पडले तर काही गुरे ढोरे ही दगावली कपडे धूनी भांडी करणाऱ्या महिला नागरीकांना देखिल याचा त्रास अनेकदा सहन करावा लागला असुन या नागरिकांनी कमालीची आक्रमत्ता दाखवत यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी पाठबंधरे विभागासह पोलिस ठाण्यात केली असल्याचे ऐनघर ग्राम पंचायतीचे माजी सरपंच मनोहर सुटे यांनी सांगितले .
Comments
Post a Comment