एल्पी कंपनी मालक तसेच रोहा एम.आय.
डी. सी. असोसिएशन अध्यक्ष बारदोस्कर
यांच्यावर गुन्हा दाखल करा : रघुनाथ कडू जिल्हाअध्यक्ष बळीराजा शेतकरी सामाजिक संस्था
रायगड : किरण मोरे :- नागोठणे जवळच असलेल्या पाटणसई ग्रामपंचायत हद्दीतील वाकण नाका परिसरातील वजरोली येथील अंबा नदीमध्ये वजरोली ते के टी बंधारा परिसरात काही दिवसांपूर्वी एका अशात इसमाने रोहा तालुक्यातील एका कंपनीचे केमिकल सोडल्याने नदीत अनेक मासे मृत झाले तसेच नदीतील पाणी देखील दूषित झाले होते. त्यामुळे ऐनघर, पाटणसई, नागोठणेसाहपेण तालुक्यातील जवळजवळ ५४ गावांमधील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच पाण्याचा फारच घाण वास येत असल्यामुळे पिण्याचा पाण्याचादेखील फार मोठा प्रन निर्माण झाला आहे, परंतु अखेर पाटबंधारे उपविभाग कोलाडचा कंत्राटी कामगार प्रदिप बाईत व सतर्क नागरिकांच्या सहकार्यानेन कोलाड पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहा. पोलीस उपनिरीक्षक नरेश पाटील व चालक पो. हा, कृष्णा म्हात्रे सतर्कपणे नडवली (कोलाड), अंबा कालवा हेड येथे केमिकल (सल्फरिक ऍसिड), सोडणाऱ्या टैंकर (एमएच ४६ एफ ६१९९) चालक मोहम्मद इकबाल अफसर शेख (वय ३३, राहणार कुर्ला मुंबई) याला गुरुवार दि. ६ जून रोजी पहाटे ४ वाजता रंगेहाथ पकडले.
त्यानंतर ऐनघर व पाटणसई परिसरातील असंख्य नागरिकांनी कोलाड पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यानंतर कोलाड पोलिसांनी कोलाड पोलिसांनी टँकरचालक, टैंकर मालक व एल्पी केमिकल कंपनी धाटाव रोहा यांच्यावर दुषित व उग्र वासाचे द्रव सुरक्षित ठिकाणी न पोहचवता जाणीवपूर्वक धोका उत्पन्न होईल अशा ठिकाणी अंबा कलव्यांच्या पाण्यात सोडून मनुष्य व प्राणी जीवितास घातक आहे असे माहित असूनसुद्धा घातककृती केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे दरम्यान याबाबत पढील तपास कोलाड पोलिस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन चौधरी व कोलाड पोलीस करीत आहेत.
तरी सल्फरिक ॲसिड या केमिकलने भरलेला टँकर पाण्यामध्ये सोडल्यामुळे नागोठणे विभागातील जनतेला साथीचे रोगाचा सामना करावा लागलेला आहे. हे केमिकल स्लोपॉईजन असून या केमिकलमुळे अनेक गुरे मृत झालेली आहेत.
कालव्यात व अंबा नदीच्या पाण्यात केमिकल सोडणारे मानव्याच्या जीवाशी खेळणारे टैंकर चालक मालक व एल्पी कंपनी व्यवस्थापनावर कोलाड पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे परंतु संबंधित कॉन्ट्रक्टर तसेच एल्पी कंपनीचे मालक, रोहा एमआयडीसी असोसिएशन अध्यक्ष बारदोस्कर यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला गेला पाहिजे अशी मागणी बळीराजा शेतकरी सामाजिक संस्थेचे रायगड जिल्हाध्यक्ष रघुनाथ कडू यांनी केली आहे.
Comments
Post a Comment