
तांबडी बुद्रुक येथील नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद शंभरहून अधिक रुग्णांची तपासणी तेरा रुग्णांवर मोती बिंदू शस्त्रक्रिया. कोलाड (विश्वास निकम) लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहा, लायन्स क्लब ऑफ रोहा, लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग, समता फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीने तसेच मानसी इंटर प्रायजेस,प्रो. माधव आग्री कोलाड लायन्स क्लबचे मूळ मार्गदर्शक लायन रविंद्र घरत तसेच तांबडी बुद्रुक ग्रामस्थ व महीला मंडळ, आणि मुंबईकर यांच्या सौजन्याने तांबडी बुद्रुक येथे रविवारी २८ जुलै रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याला रुग्णांचा उत्स्पूर्त प्रतिसाद मिळाला असून परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत शंभरहून रुग्णाच्या मोफत तपासणी करून यातील तेरा रुग्णांवर मोती बिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहा ही संस्था लायन्स क्लब ऑफ इंटनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३१ ए ४ च्या मार्गदर्शनाखाली गेली चार वर्ष सामाजिक, शैक्षणीक, आरोग्य, पर्यावरण, कला, क्रिडा, सांस्कृतिक,असे विविध उपक्रम राबवत असून सेवादाई कार्य करत आहे या अनुषंगाने रोहा तालुक्यातील मौजे तांबडी बुद्रुक येथे श्री...