नारीशक्ती सामाजिक महिला संस्थेच्या अध्यक्ष पदी वर्षा जांबेकर यांची निवड
कोलाड (विश्वास निकम) :- नारिशक्ती सामाजिक महिला संस्था ही संस्था संपूर्ण महाराष्ट्र भर महिलांसाठी सामाजिक काम करीत असुन या संस्थेमध्ये सन ४ जुलै २०२४ ते ४ जुलै २०२५ या सालाकरिता नाममात्र सभासद करून घेण्यात आले असुन या सालाकरिता आमडोशी येथील बँक सखी तथा सामाजिक कार्यकर्त्यां वर्षा वासुदेव जांबेकर यांची नारिशक्ती सामाजिक महिला संस्थेच्या रोहा तालुका अध्यक्ष पदी निवड झाली असल्याचे नियुक्ती पत्र नारिशक्ती सामाजिक महिला संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राहुल भापकर तसेच सचिव हेमलता निबांळकर यांनी दिला आहे.
वर्षा जांबेकर या बँक सखी म्हणून काम करीत असुन विविध सामाजिक कार्यात त्या सक्रिय आहेत तसेच ऐनघर,आमडोशी पंचक्रोशीत विविध बचत गटाना त्या मार्गदर्शन करीत असुन त्यांनी केलेल्या सामाजिक कामगिरीच्या जोरावर वर्षा जांबेकर यांना २३ मार्च २०२३ तसेच २१ ऑक्टोबर २०२३ या एकाच वर्षी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.त्यांची नारीशक्ती सामाजिक महिला संस्थेच्या रोहा तालुका पदी निवड झाल्यामुळे त्यांचे विविध स्थरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment