मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारामती विमानतळ येथे स्वागत
बारामती : प्रथिनिधी :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारामती येथील विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या समवेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे होते. प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पुष्पगुच्छ देवून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे आदी उपस्थित होते.
आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी व पाहणी दौऱ्याकरीता मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे बारामती विमानतळ येथून वाहनाने पंढरपूरकडे प्रयाण झाले.
Comments
Post a Comment