तांबडी बुद्रुक येथील नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद शंभरहून अधिक रुग्णांची तपासणी तेरा रुग्णांवर मोती बिंदू शस्त्रक्रिया.
कोलाड (विश्वास निकम) लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहा, लायन्स क्लब ऑफ रोहा, लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग, समता फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीने तसेच मानसी इंटर प्रायजेस,प्रो. माधव आग्री कोलाड लायन्स क्लबचे मूळ मार्गदर्शक लायन रविंद्र घरत तसेच तांबडी बुद्रुक ग्रामस्थ व महीला मंडळ, आणि मुंबईकर यांच्या सौजन्याने तांबडी बुद्रुक येथे रविवारी २८ जुलै रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याला रुग्णांचा उत्स्पूर्त प्रतिसाद मिळाला असून परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत शंभरहून रुग्णाच्या मोफत तपासणी करून यातील तेरा रुग्णांवर मोती बिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहा ही संस्था लायन्स क्लब ऑफ इंटनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३१ ए ४ च्या मार्गदर्शनाखाली गेली चार वर्ष सामाजिक, शैक्षणीक, आरोग्य, पर्यावरण, कला, क्रिडा, सांस्कृतिक,असे विविध उपक्रम राबवत असून सेवादाई कार्य करत आहे या अनुषंगाने रोहा तालुक्यातील मौजे तांबडी बुद्रुक येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृह या ठिकाणी रविवारी सकाळी ९ ते दुपारी २ वाजता या दरम्यान
लायन्स क्लब कोलाड,रोहा,लायन्स हेल्थ फाऊंडेशन,समता फाऊंडेशन ,यांच्या वतीने या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोती बिंदू शस्त्रक्रिया,दंत तपासणी ,तसेच मधुमेह रक्तदाब तपासणी (डायबेटिस) अशा विविध आजारांची मोफत तपासणी करून त्यांना प्रथोमचार करण्यात आहे असून या शिबिराचा शंभरहून अधिक रुग्णांनी या संधीचा लाभ घेत तपासणी केली तर तेरा रुग्णांवर मोती बिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.
सामाजिक शैक्षणिक कला क्रिडा सांस्कृतिक आरोग्य पर्यावरण तसेच विविध स्तरांवर त्याच बरोबर कुणबी समाज नव्हे तर इतर जातीतील श्रमजीवी कष्टकरी शेतकऱ्यांचे मुले शिकली पाहिजे ती सक्षम बनली पाहिजे त्यासाठी आवश्यक लागणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न प्रो.माधव आग्री सातत्याने प्रयत्न करीत असतात याच भावनेतून येथील गरजूंना या संस्थांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणीत नेत्र तपासणी,दंत तपासणी, मधुमेह रक्तदाब तपासणी अशा आजारांवरील आरोग्य शिबराचे आयोजन केले होते.
यावेळी लायन्स क्लब कोलाड चे अध्यक्ष डॉ मंगेश सानप,रोहा क्लबचे अध्यक्ष भाऊसाहेब माने, क्लबचे मार्गदर्शक रविंद्र घरत,डॉ विरेंद्र,डॉ शुभदा कुडतुडकर,कोलाड लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ सागर सानप,प्रो.माधव आग्री, मानसी इंटरप्राजेसचे व्यवस्थापक तथा माजी सरपंच हरेश नायणेकर, सरपंच परशुराम पवार,उद्योजक संदीप सावंत, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष किसन नायणेकर,मुंबई मंडळाचे अध्यक्ष अनिल खांबे,महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ अनिता नायणेकर,माजी सरपंच दामोदर खांबे, सुमित कदम,
निलेश शितप,ग्राम पंचायत सदस्य मिलिंद आग्री, अमित जिनगिरे, शिरीष कदम, महादेव मालकर,योगेश खांबे,वैभव शितप,कल्पेश जिनगरे
कु. वासुदेव गिजे, कु. तुषार गिजे, योगेश कदम, हरिश्चंद्र आग्री, ज्येष्ठ कार्यकर्ते सखाराम जिनगरे,गावाचे उपाध्यक्ष अंबाजी जिनगरे, पांडूरंग गायकर ,खजिनदार रामचंद्र खांबे ,सह खजिनदार राजेंद्र आग्री, सदस्य प्रवीण कदम आदी ग्रामस्थ, मुंबई मंडळ पदाधिकारी तसेच लायन्स क्लब कोलाड,लायन्स क्लब रोहा चे सर्व पदाधिकारी तसेच बहुसंख्येने रुग्ण उपस्थित होते.
यावेळी दंत तज्ञ डॉ एन विरेंद्र रोहा यांनी पन्नासहून अधिक रुग्णांची दंत तपासणी करून त्यांना प्राथमिक उपचार केले ,डॉ शुभदा कुडतुडकर लायन हेल्थ फाऊंडेशन अलिबाग यांच्या टीमने शंभरहून अधिक रुग्णांची नेत्र तपासणी करत उत्तम मार्गदर्शन केले तर तेरा रुग्णांवर लायन हेल्थ फाऊंडेशन अलिबाग येथे मंगळवारी मोती बिंदू शस्त्रक्रिया करण्यात आले.तसेच अलिबाग मांडवा लायन्स क्लबच्या वतीने या ठिकाणी एंशी रुग्णांची मधुमेह रक्तदाब तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलन व शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन तसेच श्रीफळ वाढवून कऱण्यात आली.तर आलेल्या पाहुण्यांचे तसेच तपासणी तज्ञांचे स्वागत प्रो.माधव आग्री ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ तांबडी बुद्रुक यांनी केले .
Comments
Post a Comment