आमदार निधीतील दिव्यांग निधीचे वाटप विविध उपक्रम, कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्याची उरण दिव्यांग सामाजिक संस्थेची मागणी.
३० लाख रुपये दिव्यांग निधी.
दिव्यांग निधीच्या उपक्रम, कार्यक्रमाच्या प्रतीक्षेत दिव्यांग बांधव.
आमदार महेश बालदी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद.
उरण (विठ्ठल ममताबादे) :- दिव्यांग निधी अभावी दिव्यांग बांधवांचे अनेक समस्या प्रलंबित आहेत.त्या समस्या सोडवण्यासाठी दिव्यांग बांधवांना आमदार निधीतील दिव्यांग निधीची अत्यंत आवश्यकता आहे . २०२३ ते २०२४ चा आमदार निधीतील दिव्यांग निधी ३० लाख रुपये विविध उपक्रम, कार्यक्रमासाठी मिळाले नसल्याने दिव्यांग बांधवांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या उरण दिव्यांग सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी सदस्यांनी विद्यमान आमदार महेश बालदी यांची भेट घेउन दिव्यांग निधी विविध उपक्रम, कार्यक्रमाच्या स्वरूपात त्वरित मिळावे यासाठी त्यांना निवेदन दिले.सदर दिव्यांग बांधवांनी आपले समस्या आमदारांसमोर मांडली.यावर दिव्यांग बांधवांच्या समस्या समजावून घेत दोन महिन्याच्या आत आचारसंहिता लागायच्या अगोदर दिव्यांग निधी आणण्याचे व विविध उपक्रम, कार्यक्रमाच्या माध्यमातून वस्तू तसेच साहित्य स्वरूपात ते वितरित करण्याचे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी दिव्यांग बांधवांना दिले आहे.यावेळी आई फौंडेशनचे संस्थापक व उरण दिव्यांग सामाजिक संस्थेचे सदस्य संदेश राजगुरू, उरण दिव्यांग सामाजिक संस्थेचे सेक्रेटरी उमेश पाटील, योगेश पाटील, मिलटन मिरंडा, हर्षदा घरत, अस्मिता म्हात्रे, राजश्री घरत, माधुरी पाटील,ओम ठाकुर,गणेश पाटील व इतर दिव्यांग हजर होते.
Comments
Post a Comment